आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांसमक्ष नाही, दुर्गेच्या फोटोसमोर केले आत्मसमर्पण, अशा होत्या 4 अटी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - बेहमाई नरसंहाराच्या 2 वर्षांनंतरही गरीबांची डाकूराणी फूलन देवी पोलिसांच्या हाती आलेली नव्हती. 1983 मध्ये तिनेच आत्मसमर्पणाची तयारी दाखवली. टोळीयुद्ध, पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये गँगच्या सदस्यांचा मृत्यू आणि खराब आरोग्यामुळे तिच्यासमोर सरेंडरशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. फूलन तिला उत्तर प्रदेशच्या पोलिसांवर मुळीच विश्वास नव्हता. त्यामुळे, पोलिसांसमोर नाही तर दुर्गेच्या आणि महात्मा गांधींच्या फोटोसमोर तिने आत्मसमर्पण केले होते. एवढेच नव्हे, तर सरेंडर करताना तिने प्रशासनासमोर 4 अटी ठेवल्या होत्या. डाकूराणीच्या सरेंडरचा साक्षीदार होण्यासाठी 10 हजारांहून अधिक समर्थकांसह 300 पोलिस जमले होते. 
 
 
#1 
सरेंडरनंतर कुठल्याही प्रकारच्या खटल्यात आपल्याला मृत्यूदंड होणार नाही याची खात्री पटवून देणे. केवळ स्वतःलाच नव्हे, तर सरेंडर करणाऱ्या टोळीतील इतर कुठल्याही सदस्याला मृत्यूदंड दिला जाणार नाही अशी पहिली अट फूलन देवीने ठेवली होती. 
 

पुढील स्लाईड्सवर वाचा, आत्मसमर्पणाच्या इतर अटी...
बातम्या आणखी आहेत...