आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographs Of British India Captued By French Painter George Gaste

पाहा, फ्रेंच फोटोग्राफर जॉर्ज गास्‍तेने टिपलेली स्‍वातंत्र्यपूर्व भारताची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाल- फ्रांस दुतावासाच्‍या मदतीने अलियांस फ्रांसिस द भोपाल या संस्‍थेने 20 व्‍या शतकातील भारताचे छायाचित्र प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनामध्‍ये फ्रेंच फोटोग्राफर जॉर्ज गास्‍ते यांनी टिपलेली छायाचित्रे ठेवण्‍यात आली आहेत. 1905 ते 1910 या कालावधीत गास्‍ते यांनी हे फोटो आपल्‍या कॅमे-यात कैद केली आहेत. 12 फेंब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सुरु असणार आहे.
आग्राच्‍या ताजमहल जवळील छायाचित्रे
छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संस्कृति संचालनालयाचे प्रमुख सचिव मनोज श्रीवास्तव यांनी केले. प्रदर्शनामध्‍ये जॉर्ज गास्‍त यांच्‍यावर आधारीत लघूचित्रफीतही दाखविण्‍यात आली. सोबतच त्‍यांच्‍या पेटिंग्‍जही ठेवण्‍यात आल्‍या होत्‍या.
जॉर्ज गास्ते चित्रकार होते. त्‍यांनी भारतातील ग्वालियर, बनारस, मदुराई , आग्रा येथे जावून चित्र काढले. त्‍यांनी ताजमहल अप्रतिमपणे कॅनव्‍हॉसव टटिपला. त्‍यांची काढलेली छायाचित्रे फोटो सारखी वाटत असत.
भारतातच झाला मृत्‍यू
जॉर्ज गास्ते पाच वर्ष भारतात राहिले. खुप सारे चित्र रेखाटले. भारतातील कित्‍येक क्षण कॅमे-यात कैद केले. शेवटी त्‍यांचा मृत्‍यू ही भारतातच झाला. त्‍यांचे भारतावर खूप प्रेम होते. येथिल संस्‍कृती त्‍यांना प्रिय होती.
पुढील स्‍लाइडवर पाहा, स्‍वातंत्रयपूर्व भारताची छायाचित्रे...