भोपाळ - साऊथ सुदानची राजधानी जुबा येथे बुधवारी एक विमान कोसळले. यात 40 प्रवाशी ठार झाले. स्थानिक बातम्यांनूसार फक्त दोन लोकांचा जीव वाचला. अनेक वर्षांपासून आपसातील यादवीच्या झळा सोसत असलेल्या या देशाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. येथील जनतेच्या जेवण्या-खाण्याची व्यवस्था संयुक्त राष्ट्रावर आहे. संयुक्त राष्ट्राच्या सेना येथील शांततेसाठी तैनात आहेत. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश पोलिसचे अधिकारी जितेंद्र पाठक सुदानमध्ये तैनात होते. नुकतेच ते भारतात परतले आहेत. त्यांनी divaymarathi.com सोबत सुदानमधील अनुभव शेअर केले. सुदानमधील काही फोटो दाखवत त्यांनी तिथल्या परिस्थितीची माहिती दिली.
सुपिक जमीन मात्र कोणीच शेती करत नाही
पाठक म्हणाले, 'सुदानमध्ये उत्तम शेत जमीन आहे, मात्र कोणीत शेती करत नाही. सरकारने शेतीवर 70 टक्के कर लावलेला आहे. लोकांकडे खायला काही नाही, अशी परिस्थिती आहे. कित्येक लोग गोमांस खातात. संयुक्त राष्ट्राकडून वाटप होणाऱ्या खाद्य पदार्थांवरच ते निर्भर आहेत. सुदानमध्ये तेल भांडार आहे, मात्र रिफायनरी नसल्यामुळे त्याचा काहीही उपयोग होत नाही.'
दोन समजांमध्ये सुरु आहे संघर्ष, चीनी बनावटीची शस्त्रे सापडली
पाठक यांच्या म्हणण्यानूसार, 'सुदानमध्ये डिंका आणि नेयूर आदिवासी समाज यांच्यात संघर्ष सुरु आहे. सध्या डिंका समुदायाकडे सुदानची सत्ता आहे, तर नेयूर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यात व्यस्त आहे. या दोन्ही समुदायांच्या संघर्षात सर्वसामान्य भरडले जात आहे. येथील 50 टक्के लोकांना शांतता हवी आहे. हे लोक सुदानच्या पाच प्रांतात संयुक्त राष्ट्राने तयार केलेल्या शिबीरात राहात आहेत. संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेने कित्येकवेळा येथे शस्त्र जप्त केले आहेत. येथे विदेशातून शस्त्र येतात. बहुतेकदा ते मेड इन चायना असतात.' पाठक सुदानमधील मलाकाल आणि जुबा येथे एक वर्ष राहिले. संयुक्त राष्ट्राच्या पोलिसांना येथे राहाण्यासाठी फार काही सोयी-सुविधा नाहीत. त्यांना स्वतःचे जेवण स्वतः तयार करावे लागते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सुदानमधील परिस्थिती (यातील काही फोटो जितेंद्र पाठक यांनी शेअर केले आहेत.)