आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनविरुद्ध मध्य प्रदेश उच्च न्यायालयात याचिका, भारतरत्न परत घेण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ (मध्य प्रदेश)- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविरुद्ध मध्य प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यात सचिनचा भारतरत्न मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यात सांगितले आहे, की भारतरत्न मिळालेला सचिन आजही जाहिरातींमध्ये काम करतो. भारताच्या सर्वोच्च सन्मानाचा अशा प्रकारे वापर करणे चुकिचे आहे. भोपाळचे व्ही. के. नसवाह यांनी ही याचिका दाखल केली आहे.
याचिकाकर्ता म्हणाला- सचिनने जाहिरातीत काम करणे चुकिचे
व्ही. के. नसवाह यांनी म्हटले आहे, की देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यावर जाहिरातीत काम करणे चुकिचे आहे. केवळ मीच नाही तर देशातील अनेक लोक असाच विचार करतात. याबाबत न्यायाधीश के. के. त्रिवेदी आणि मुख्य न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांनी केंद्र सरकारला विचारले आहे, की सर्वोच्च न्यायालयाने अशा एखाद्या प्रकरणात आदेश दिला आहे का? असे काही प्रकरण विचाराधीन आहे का?
भारतरत्नाचा व्यावसायीक वापर
व्ही. के. नसवाह यांनी सांगितले, की सचिनने याची नैतिक जबाबदारी घ्यायला हवी. त्याने स्वतःहून हा पुरस्कार परत करायला हवा. अन्यथा भारत सरकारने अॅक्शन घेऊन हा पुरस्कार परत घ्यायला हवा. या पुरस्काराचा व्यावसायीक वापर करणे बेकायदेशीर आहे.
सचिन तेंडुलकर सध्या अविवा लाइफ इन्शुरन्स, बुस्ट, एमआरएफ, ल्युमिनससह सुमारे 12 ब्रॅंड्स एन्डॉर्स करीत आहे. त्याने नोव्हेंबर 2013 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने त्याला भारतरत्न दिला होता.
एकटा सचिनच करतोय असे
याचिकेत सांगण्यात आले आहे, की आतापर्यंत जेवढ्या लोकांना भारतरत्न मिळाला आहे त्यातील केवळ सचिनच जाहिराती करतो. विशेष म्हणजे या पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर लगेच अशा स्वरुपाचे प्रश्न विचारण्यात आले होते. यापूर्वी मुंबईच्या एका एनजीओने सचिनला पत्र लिहून अशा स्वरुपाच्या जाहिराती न करण्याचा सल्ला दिला होता.
बातम्या आणखी आहेत...