इटारसी - शत्रुंचा मनसुबा उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची स्वदेशी बनवाटीच्या अत्याधुनिक रॉकेट पिनाकची निर्मिती इटारसीच्या ऑर्डिनेंस फॅक्ट्रीमध्ये होणार आहे. 11 डिसेंबर 2014 ला पिनाक मार्क-2 च्या यशस्वी आणि शेवटची चाचणी ओडीशाच्या बालसोर जिल्ह्यातील चांदपूर यथे करण्यात आली. इटारसी फॅक्ट्रीमध्ये आतापर्यंत गाईडेड मिसाईल प्रोजेक्टच्या अंतर्गत मिसाईल्सचे प्रोपेल्शन सिस्टीमची निर्मिती केली जात होती.
अत्यंत दर्जेदार व अत्याधुनिक पिनाक मार्क-2 ची संपूर्ण निर्मिती आता इटारसीमध्येच होणार आहे. याच्या निर्मितीसाठी एका मोठ्या युनिटची स्थापना फॅक्ट्रीच्या परिसरात करण्यात येईल. गुरुवारी डीआरडीओ पुणे येथील संरक्षण तांत्रिक वैज्ञानिक कोल्हापुरकर यांनी पिनाक मार्क-2 ची टीओटी ऑर्डिनेंस फॅक्ट्री इटारसीच्या जीएम ईआर शेख यांना हस्तांतरीत केले.
पिनाकची वैशिष्ट्ये
मारक क्षमता- 65 किमी
लांबी- 4.19 मीटर
व्यास- 214 सेमी
बॉमचे वजन - 100 किग्रॅ
एकूण वजन- 276 किग्रॅ
44 सेकंदात एकाच वेळेस सुटतात 12 रॉकेट
रॉकेट लाँचरने 12 पिनाक रॉकेट एकाच वेळी केवळ 44 सेकंदात सुटतात आणि हे 65 किमीपर्यंत मारा करू शकतात. हे 3.9 किमीच्या परिसरातील सर्व काही उद्ध्वस्त करू शकते. या रॉकेट लाँचरने बंकर आणि कठीण धातूंनी बनलेल्या सर्वच परिसराला पूर्णपणे उद्ध्वस्त करता येते.
1995 पासून सुरू आहे पिनाकच्या विकासाचे काम
स्वदेशी निर्मिती गाइडेड रॉकेट पिनाक मार्क-2 च्या विकासाचे काम 1995 पासून डीआरडीए करत आहे. 11 डिसेंबर 2014 ला चांदपूर रेंजमध्ये याच्या तीन कठीण चाचण्यांनंतर याला लष्करामध्ये सामिल करून घेण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला. यासाठी इटारसीच्या फॅक्ट्रीला निवडण्यात आले आहे.
शस्त्र निर्मिती केंद्र असलेल्या इटारसी फॅक्ट्रीची क्षणता आणि दक्षता पाहून डीआरडीओ यांनी विश्वासाने हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आम्हाला दिला आहे.
- ईआर शेख, महाप्रबंधक, ऑर्डिनेंस फॅक्ट्री इटारसी
पुढील स्लाईडवर पाहा, या मिसाईलची छायाचित्रे...