आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: कारमध्ये दिसले केवळ मोदींचे हात, लोकांनी दुर्बीणीतून पाहिले पंतप्रधानांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंदौरला पोहोचले. विमानतळावरून ब्रिलियंट कन्वेंशन सेंटरपर्यंत ते केवळ 14 मिनिटांपर्यंत पोहोचले. नरेंद्र मोदींनी कारमध्ये बसल्या बसल्या लोकांचे अभिवादन केले. ते रस्त्यावरून लोकांना हात हालवून शुभेच्छा देत होते. तर दुसरीकडे मोदींची एक झलक पाहाण्यासाठी कोणी दूरबीण तर कोणी बॅरिगेट्सवर चढले.
पंतप्रधान येण्यापूर्वी आणि जाईपर्यंत व्हीव्हीआयपी मार्ग सुरक्षाच्या दृष्टीने सकाळी आठ वाजेपासून जवळपास चार तासांपर्यंत बंद ठेवण्यात आला. एसपीजीने या दरम्यान संपूर्ण सुरक्षा व्यवस्था संभाळली.
एक दिवसापूर्वी झाला सराव
बुधवारी अधिकार्‍यांनी मोदी यांच्यासाठी खास बुलेटप्रूफ गाड्यांचा ताफ्यामध्ये समावेश करून सराव केला. एसपीजीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या सरावात मोदींसाठी जॅमर, दोन टाटा सफारी आणि मर्सिडिज समवेत 18 वाहनांचा ताफा जवळपास 14 मिनटातच विमानतळावरून ब्रिलियंट कन्वेंशन सेंटर पोहोचला.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, मोदींच्या इंदौर दौर्‍याचे फोटो..