आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Modi Will Stay In Suit During Global Investers Summit

\'मिनी मुंबई\'च्या या स्वीटमध्ये थांबणार मोदी, पाहा, रुमच्या आतील PHOTO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मोदी यांच्या निवासासाठी ब्रिलियंट कन्वेंशन सेंटरमधील रुम नंबर 101 तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री चौथ्या मजल्यावरील सुईटमध्ये थांबणार)

इंदूर - ग्लोबल इन्वेस्टर्स समिटच्या तयारी शेवटच्या टप्प्यात आल्या आहे. 9 ऑक्टोबरला 'मिनी मुंबई' मानल्या जाणार्‍या इंदूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. मात्र या कार्यक्रमात ते केवळ एकच तास थांबणार आहेत. तरीही त्यांच्या कार्यक्रम स्थळावर पहिल्या मजल्यावर एक रुम तयार करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण चौथ्या मजल्यावरील स्वीटमध्ये थांबणार आहेत. दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर अनेक मंत्री आणि विभागांचे पीएस थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
उद्घाटन प्रसंगी 9 ऑक्टोबरला देशातील महत्त्वाचे सर्व उद्योगपती या कार्यक्रमात उपस्थित राहतील. राज्य सरकारने व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी पाहूण्यांसाठी लंचसाठी मरूट सिक्का यांना निवडले आहे. सिक्का हे देशातील मुख्य फूड कंसल्टंट आहे. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, अमिताभ बच्चन तसेच त्यांचे कुटुंबिय आणि इतरही मोठ्या व्यक्तींसाठीही जेवणाचा मेनू तयार करतात. ते एक दिवस आगोदरच इंदूरला येणार आहेत. लंच मध्ये 200 व्हीव्हीआयपी आणि 400 व्हीआयपी पाहूणे असतील यावेळी डिनर सयाजी हॉटेलमध्ये होणार आहे तसेच तेथे सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या या दौर्‍याच्या सुरक्षेसाठी एसपीजीचे काही अधिकारी रविवारी इंदूरला आले होते. त्यामध्ये प्रमुख सचिव उद्योग मोहम्मद सुलेमान यांनी तयारींची तपासणी केली.

कार्यक्रमाच्या मंचावर पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री यांच्याशिवाय 38 उद्योगपति असणार आहेत. तसेच 82 जणांची बैठक आहे.
व्हीव्हीआयपी पाहूण्यांसाठी गोल्ड, व्हीआयपी पाहूण्यांसाठी सिल्वर, अधिकार्‍यांसाठी रेड, लोकल स्टाफसाठी यलो तसेच ऑर्गनायझरसाठी ब्लू रिबिन कार्ड बनवण्यात आले आहेत.

अनिल अंबानी, शशि रूहीया, आईटीसीचे चेअरमन वाय. ए. सी देवेश्वर, अभय फिरोदिया आठ ऑक्टोबरला इंदूरला येणार आहेत. सर्व उद्योगपतींची हॉटेल रेडिसन येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मुकेश अंबानी हॉटेल फॉर्च्यून लँडमार्कमध्ये थांबतील. ते नऊ ऑक्टोबरला सकाळी येणार आहेत.

पाहूण्यांकडून मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी यांसारख्या कार मागवण्यात आल्या आहेत. तसेच शहरामध्ये यासारखी केवळ दहाच कार भाड्याने मिळत आहेत.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, या कार्यक्रमाच्या तयारीचे फोटो...