आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतर्कतेच्या वेळी देश निद्रिस्त राहिल्यास सैन्य क्षमा करणार नाही : पंतप्रधान मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - सर्जिकल स्ट्राइकच्या १५ दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्याचबरोबर त्यांनी जनतेलाही जागरूक राहण्याचे आवाहन केले. जागे होण्याच्या वेळी देश निद्रिस्त राहिल्यास लष्कर कधीही क्षमा करणार नाही, असे मोदी यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी पंतप्रधानांच्या हस्ते शौर्य स्मारकाचे उद््घाटन झाले. या स्मारकावर सुमारे ४१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याप्रसंगी मोदी सैनिकांना संबोधित करताना म्हणाले, आपण निश्चिंत झोपलेले सैन्याला नक्कीच आवडते, परंतु जागे होण्याच्या वेळी निद्रिस्त राहिल्यावर मात्र लष्कर क्षमा करणार नाही. खरे तर लष्कर बोलत नाही, पराक्रम करते. पहिल्यांदा बोलत होतो. पूर्वी लोक मला मोदी निद्रिस्त आहेत, काहीच करत नाहीत, असे टोमणे मारत. लष्कराप्रमाणेच संरक्षणमंत्रीदेखील बोलत नाहीत. संरक्षण क्षेत्रात देशाने स्वावलंबी होण्याची वेळ आली आहे. सरकार काम करत आहे, जेणेकरून भविष्यात आपण इतर देशांना संरक्षण साहित्याची विक्री करता येऊ शकेल. दरम्यान, काश्मीरमध्ये दगडफेक होते. परंतु नैसर्गिक संकट येते तेव्हा सैन्यच काश्मिरातील जनतेच्या मदतीला धावून जाते. पीडितांचे प्राण वाचवण्याचे काम सैन्य करते. काही लोकांनी आपल्यावर दगडफेक केली होती असा विचार सैन्य करत नाही, असे मोदी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...