आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MP : पलंगाखाली ठेवला नवऱ्याचा मृतदेह, प्रियकरासोबत केली कामक्रीडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडवा/इंदूर - एका व्‍यक्‍तीला त्‍याच्‍या पत्‍नीनेच प्रियकराच्‍या मदतीने (मानलेला भाऊ) ठार केले. एवढेच नाही तर त्‍याचा मृतदेह पंलगाखाली ठेवून प्रियकरासोबत कामक्रीडाही केले. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्‍नी दुर्गाबाई आणि तिचा प्रियकर सुनील यांना अटक केली. त्‍यांनीच ही धक्‍कादायक कबुली दिली.
अशी होती प्रेमकहानी...
खरगोन जिल्‍ह्यातील बागदरी गावातील नाहरसिंह हा काही दिवसांपासून बेपत्‍ता होता. त्‍याचे वडील सरदारसिंह यांनी या बाबत पोलिसांत तक्रार दिली. दरम्‍यान, नाहरसिंहच्‍या भावाने या बाबत दुर्गाबाईला विचारले. पण, ती उडवा-उडवीची उत्‍तरे देत होती. शिवाय नाहरसिंह गायब झाल्‍यानंतर सुनीलचे त्‍याच्‍या घरी येणे - जाणे वाढले होते.
असा झाला खुनाचा गौप्‍यस्‍फोट
> दुर्गाबाई आणि सुनीलने नाहरसिंगचा 13 मेच्‍या मध्‍यरात्री खून केला.
> त्‍या नंतर त्‍याचा मृतदेह घरातच पलंगाखाली गाडला.
> त्‍याची दुर्गंधी येऊ नये म्‍हणून ते रोज अत्‍तर शिंपडायचे.
> काही दिवसानंतर त्‍यांनी तो मृतदेह बाहेर काढून इंदूर रस्‍त्‍यावरील बलखडपुरा येथील एका शेतात जाळला.
> दुसऱ्या दिवशी शेतमालकाला अर्धवट जळालेला मानवी सांगाडा दिसला.
> त्‍याने या बाबत पोलिसांना माहिती दिली.
> इकडे नाहारसिंग गायब झाल्‍याची तक्रार दिली होती.
> पोलिसांना त्‍याच्‍या बायकोवर शंका होतीच.
> त्‍या आधारे पोलिसांनी तपास केला.
> यात हा प्रकार उघड झाला.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...