आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Arrest Husband And Wife With 70 Kilo Ganja From Ujjain, Which Is Smugelled And Then Take For Delivery Indore News

पत्नीच्या सौंदर्याचा गैरफायदा घेत होता पती, पडद्याआड करायचा गांजाची तस्करी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: गांज्याची तस्करी करणारी महिला आरोपी नीलम)
इंदूर- मध्यप्रदेशातील उज्जैनमधील माधवनगर पोलिसांनी गांजाची तस्करी करणार्‍या पती-पत्नीला अटक केले. दोघे डस्टर कारने 50 किलो गांजाची डिलिव्हरी देण्यासाठी जात असतानाचा पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केले. आरोपींकडून डस्टर कार, 70 किलो गांजा असा 17 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी शीतलाप्रसाद गुप्ता (34) हा पत्नी नीलम (25) हिच्या सौंदर्याचा फायदा घेऊन गांजाची तस्करी करत असल्याची धक्कादायक माहिती पोलिस चौकशीत उघडकीस आली आहे.

महाराष्ट्रातून गांजा मागवून तो शहरात विक्री करत असल्याचे आरोपी संजू आणि नीलम हिने पोलिस चौकशीत सांगितले. शहरात गांजा तस्करीचे मोठे रॉकेट सुरु असल्याचेही नीलमने पोलिसांना माहिती दिली. सोमवारी आरोपींना कोर्टात हजर करण्‍यात आले. कोर्टाने दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

एसपी एमएस वर्मा यांनी सांगितले की, दौलतगंज येथील रहिवासी संजू आणि नीलम घे दोघे नागझिरी भागात गांजाची डिलिव्हरी देण्यासाठी जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांनी प्राप्त झाली होती. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. तसेच त्यांच्या कडून 70 किलो गांजा जप्त केला.
कोण आहे नीलम....
नीलम ही मालवीय बैरागड येथील रहिवासी आहे. आठ वर्षांपूर्वी नीलम हिचा विवाह जयसिंहपुरा येथील रहिवासी राजा लोधी याच्यासोबत झाला होता. तीन वर्षांपूर्वी हत्येप्रकरण राजा लोधी याला तुरुंगवास झाला होता. नंतर नीलम हिने संजू गुप्ता याच्याशी विवाह केला होता.

महाराष्ट्रातून येत होता गांजा....
आरोपी नीलम हिने पोलिसांनी सांगितले की, संजू हा सहा महिन्यांपासून गांजाची तस्करी करत होता. संजू महाराष्ट्रातून गांजा मागवत होता. त्याचा भाऊ सुनील, जीतू बुंदेला हे देखील तस्करीत सहभागी आहेत. तिघे शनिवारी रात्री महाराष्ट्रातून माल मध्यप्रदेशात आणला जात होता. पाच हजार किलोने खरेदी केलेला गांजा 6500 रुपये प्रति किलोप्रमाणे विकला जात होता. काळ्‍या बाजारात 25 हजार रुपये किलोपर्यंत गांजा विकला जातो.

पोलिस पथकाला 15 हजारांचे बक्षीस जाहीर...
तस्करी दाम्पत्याला अटक करणार्‍या पोलिस पथकाला 15 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्‍यात आल्याचे पोलिस महानिरीक्षक व्ही. मधुकुमार यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, आरोपी नीलम आणि तिचा पती संजु गुप्ताची छायाचित्रे...