आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिटबंद दुधावर मोठा खुलासा, तुम्हीही वापरत असाल तर हे वाचाच...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांचीच्या पाकिटबंद दुधात भेसळ होत असल्याचा खुलासा झाला आहे. - Divya Marathi
सांचीच्या पाकिटबंद दुधात भेसळ होत असल्याचा खुलासा झाला आहे.
इंदूर - सांची दुधावरून मंगळवारी रात्री पोलिसांनी एका अशा टोळीला पकडले जे टँकरमधून दूर चोरून त्यात सोडियम क्लोराइडयुक्त पाणी मिसळत होते. हा खुलासा होताच शहरात मोठी खळबळ उडाली. वृत्त आल्यानंतर बुधवारी प्लांटच्या लॅब  इंचार्जसहित दोन जणांवर कारवाई झाली.
- प्रशासनाने लॅब इंचार्ज संदीपला सस्पेंडला केले, तर त्याचे दोन सहायक कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले. याशिवाय प्रशासनाने ठेकेदाराविरुद्धही एफआयआर दाखल करून त्याला ब्लॅकलिस्ट केले आहे. मिल्क ट्रान्सपोर्ट ठेकेदार सुखविंदर सिंगच्या मिलिभगतच्या शक्यतेने प्रशासनाने ही कारवाई केली.

असे आहे पूर्ण प्रकरण...
- मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी टोळीला अटक केली. ही टोळी टँकरमधून शुद्ध दूध चोरून त्या जागी केमिकलयुक्त पाणी भरत होते. हे भेसळयुक्त दूध मग घराघरात पोहोचत होते. या टोळीचा मास्टरमाइंड सुखविंदर सिंग असल्याची माहिती आहे. तो सांची दूध मध्ये मोठा ठेकेदार आहे. त्याच्याकडून फॉर्च्युनर गाडीही जप्त करण्यात आली. पूर्ण प्रकरणात पेालिसांनी सांची दूधच्या अधिकाऱ्यांची मिलिभगत असल्याचे म्हटले आहे.
 
टँकरमधून चोरत होते दूध, मिसळत होते केमिकलयुक्त पाणी
- अटक झालेल्या आरोपींनी सांगितले की, सांची प्लांटमध्ये टँकर जाण्याआधीच ते रोखले जात होते. त्यावर लावलेली सील तोडून 12 हजार लिटर टँकरमधून 3 हजार लिटर दूध चोरले जायचे. मग पुन्हा टँकर भरण्यासाठी तेवढ्याच प्रमाणात सोडियम क्लोराइड मिसळलेले पाणी भरले जात होते. यामुळे दुधाचे फॅट वाढत होते. हेच भेसळयुक्त दूध थेट सांचीच्या प्लँटमध्ये जात होते. प्लँटमध्ये दुधाची शुद्धता तपासण्यासाठी सँपल देताना हे आरोपी अगोदरच बादलीत वेगळे काढलेले दूध देत होते.
 
काय म्हणतात पोलिस?
केमिकलयुक्त दूध बनवल्याच्या प्रकरणात सुखविंदरला पीथमपुरमध्ये अटक झाली. इतर अटकेतील आरोपींमध्ये जसबीर सिंह, जोधा सिंह, राकेश, जितेंद्र, जीतू सिंह, रफीक सामील आहेत. डीआईजी हरिनारायणचारी मिश्र म्हणाले,  आरोपींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...