आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: विद्यार्थीच चालवायचे सेक्स रॅकेट, व्हॉट्स अॅपवर पाठवायचे कॉलगर्ल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- फेसबुक, व्हॉट्स अॅप सारख्या सोशल व्यासपिठांच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय केला जात आहे. एका भाड्यात घरात सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी धाड टाकली तेव्हा ही माहिती समोर आली. पोलिसांनी 8 मुले आणि 4 मुलींना ताब्यात घेतले आहे. यातील एक कॉलगर्ल भाजपच्या नेत्यासोबत आधीही सापडली होती. त्यांची चौकशी केल्यावर पोलिसांनी बरीच उपयुक्त माहिती मिळाली आहे. अशा प्रकारे इतरही भागांमध्ये हा व्यवसाय सुरु असल्याचे समजते. पोलिस तेथेही धाड टाकण्याच्या तयारीत आहेत.
ताब्यात घेण्यात आलेले विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजचे आहेत. व्हॉट्स अॅप, फेसबुक, ट्विटर या सोशल व्यासपिठांच्या माध्यमातून त्यांनी हायप्रोफाईल कॉलगर्लशी संपर्क साधला होता.
असा उघडकीस आला वेश्याव्यवसाय
हबीबगंज पोलिसांना माहिती मिळाली होती, की अरोरा कॉलनीतील ई-7 या बंगल्यात भाड्याने राहत असलेल्या युवकांकडे दररोज नवनवीन मुली येतात. पोलिसांनी येथील रचना अपार्टमेंटवर छापा टाकला. यावेळी या टोळीचा म्होरक्या अमरनाथ एका युवतीसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळून आला. त्याची चौकशी करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार आणखी एका घरावर छापा टाकण्यात आला. यात 3 कॉलगर्ल सापडल्या. येथे सात मुलेही सापडली. सगळेच आक्षेपार्ह स्थितीत होते.
मिळायचे 25 हजार रुपये महिना
पकडण्यात आलेल्या कॉलगर्ल 20-30 वर्षांच्या आहेत. एका मुलगी त्यांना महिन्याकाठी 25 हजार रुपये देऊन भोपाळला बोलवत होती. ही मुलगी कॉलगर्लची प्रमुख आहे. प्रत्येक कॉलसाठी मुलींना 1500 रुपये दिले जायचे. मुंबई येथून आलेल्या कॉलगर्ल गेल्या सात दिवसांपासून भोपाळमध्ये आहेत. त्यांनी बराच मोठा व्यवसाय केल्याचे वृत्त आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, संबंधित फोटो...
जर तुमच्या परिसरात अशा स्वरुपाचे धंदे सुरु असतील तर आम्हाला 9200010444 वर व्हॉट्स अॅप करा किंवा bplhyper@gmail.com यावर मेल पाठवा.