आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या लेडी ऑफिसरने लिहिले होते- 'देवर आधी पती परमेश्वर', बिग बींनीही शेअर केल्या पोस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2007 पासून पल्लवी यांनी लिखानास सुरुवात केली होती. - Divya Marathi
2007 पासून पल्लवी यांनी लिखानास सुरुवात केली होती.
ग्वाल्हेर - समाजात घडणाऱ्या घटना असतील नाही तर मुलगा आणि मुलीत केला जाणारा भेदभाव किंवा फेसबुक आणि इंटरनेच्या जगात बुडालेली युवा पिढी... या आणि अशा विषयांवर लिहित असतात पल्लवी त्रिवेदी. त्यांचे लिखाण हे उपहासात्मक असेत. त्यांचा वाचकवर्गही वाढत आहे. त्यात आता बिग बी अमिताभ बच्चन यांचीही भर पडली आहे. ते केवळ पल्लवी यांच्या पोस्ट वाचत नाही तर त्यावर कॉमेंटही करतात.

उपहासात्मक लिखाण करणारी लेखिका आहे पोलिस अधिकारी
> पल्लवी यांचा 'साली आधी घरवाली' ब्लॉग अमिताभ यांनी शेअरही केला आहे आणि त्यावर कॉमेंटही केली आहे.
> अमिताभ यांनी केलेली कॉमेंट त्यांचे फेसबुक पेज fb362 वर पाहाता येऊ शकते.
> त्यांनी लिहिले होते, माझ्या एका एफबी मित्राने एक सुंदर विचार शेअर केला आहे. मी माझ्या वतीने अतिशय आदराने तो महिला शक्ती आणि गर्ल चाइल्डला अर्पण करतो.
> त्यांच्या या कॉमेंटवर जवळपास 36 हजार लाइक आणि 4 हजार कॉमेंट आणि जवळपास 10 हजार लोकांनी शेअर केले होते.

सहायक पोलिस आयुक्त आहे पल्लवी त्रिवेदी
> पल्लवी त्रिवेदी या सध्या सहायक पोलिस आयुक्त पदावर कार्यरत आहेत. खाकी वर्दीच्या आतील त्यांच्यातील संवेदनशील लेखिका त्यांना काही ना काही लिहिण्यासाठी प्रेरित करत असते.
> 2007 पासून पल्लवी यांनी लिखानास सुरुवात केली होती. त्या काही प्रासंगिक लिहित होत्या. नंतर मग त्या कवितेच्या प्रांताकडे वळाल्या.
> एखादी घटना सरळ-सरळ सांगण्यापेक्षा, उपदेशाचे डोस न देता थोडी विनोदी पद्धतीने सांगतली तर ती लगेच पटू शकते. हे बरोबर हेरून पल्लवी यांनी लिखान केले आहे.
> सोशल साइटवर त्यांच्या पोस्ट एवढ्या हिट होतात की सामान्यांसह बॉलिवूड स्टारही त्या शेअर करत आहेत.
> त्यांनी टाकलेली 'देवर आधे पती परमेश्वर' ही पोस्ट बिग बी अमिताभ यांना एवढी आवडली की त्यांनी ती शेअर केली आणि त्यावर कॉमेंटही केली.
> पल्लवी सांगतात की त्यांना बर्ड फोटोग्राफी आवडते.
एक पुस्तकही प्रकाशित
> पल्लवी यांचे लिखान लोकांना एवढे पसंत पडत आहे की लोकाग्रहास्तव त्यांनी आता एक पुस्तक प्रकाशित केले आहे.
> अंजाम-ए-गुलिस्तां या त्यांच्या पुस्तकाचे जयपूरमध्ये प्रकाशन झाले आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा लेडी ऑफिसरच्या आयुष्यातील विविध रंग..
बातम्या आणखी आहेत...