आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 बॉयफ्रेंड्‍सनी नाकारले, 7 ओळींंची सुसाइड नोट लिहून तिने गोळी झाडून केली आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वॉल्हेर- पोलिस सब इन्स्पेेक्टर बनण्याचे स्वप्न पाहाणार्‍या एका तरुणीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कृष्णा असे तरुणीचे नाव होते. आत्महत्या करण्यापूर्वी तिने भावाला बाजारात भाजी आणण्यासाठी पाठवले होते. त्याचे नाव मंंगल असे आहे. तिची 7 ओळींची सुसाइड नोटही सापडली आहे. त्यात तिने दोन्ही बॉयफ्रेंड्‍सच्या कृष्णकृत्याचा उल्लेख केला आहे. दोघांंनी तिचा विश्वासघात केला होता. त्यामुुळेे तिच्यासमोर आत्महत्येेशिवाय दुसरा मार्ग शिल्लक नव्हता.

तोपर्यंत खूप उशीर झाला होता...
गोळी झााडल्याचा आवाज ऐकू येताच कॉलनीतील काही लोक तरुणीच्या घरात पोहोचले. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होते. कृष्णाचा मृत्यू झाला होता.

काय आहे हे प्रकरण?
- बसई दतिया येथील राहाणारी 22 वर्षीय कृष्णा तिचा धाकटा भाऊ मंगलसोबत चंद्रवदनी नाका परिसरातील पारस विहार कॉलनीत राहात होती.
-रविवारी सकाळी मंगल जॉगिंगला गेला होता. तो घरी परतला. त्याला तिनेे बाजारात भाजी आणण्यासाठी पाठवले.
- मंंगल घराबाहेर पडताच तिने एका कागदावर दोन तरुणांंच्या (रजनीश आणि अखिलेश) कृष्णकृत्याची कहाणी लिहिली. दोघांंनी तिला प्रेेमाच्या जाळ्यात अडवले होते. नंंतर तिचा विश्वासघात केला. त्यामुळेे आत्महत्येशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे तिने सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.
- घरात ठेवलेला देशीकट्टा काढूून डोक्यात गोळी झाडून तिने आत्महत्या केली.
- अचानक गोळी झाडण्याचा आवाज ऐकताच कॉलनीतील काही लोक आणि घरमालक धावत घराबाहेर पोहोचले.
- घराचा दरवाजा आतून बंंद होता. घरमालकाने मंगलला फोन करून बोलवून घेतले.
- मंगलने घर उघडले असता कृष्णा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
- बहिणीला अशा अवस्थेेत पाहून मंंगल बेशुद्ध झाला. घरमालकाने पोलिसांना याबाबत सुचना दिली.
काय लिहिले आहे सुसाइड नोटमध्ये...
- सुसाइड नोटमध्ये कृष्णाने लिहिले आहे की, तिच्या आत्महत्येला बसई दतिया येथील रजनीश रजक आणि पांडरी गावातील अखिलेश जबाबदार आहे.
- रजनीशने तिच्यासोबत मैत्री केेली आणि नंंतर तिचा विश्वासघात केला. इतकेेच नव्हे तर तिच्याशी त्याने सर्व संंबंंध तोडूून टाकले होते. अखिलेशने देखील तेच केेले जे रजनीशने केले होते.

भावाने सेल्फ डिफेन्ससाठी खोलीत ठेवला होता देशी कट्टा...
- कृष्णाच्या मृतदेहाजवळ देशी कट्टा सापडला. तिने स्वत: डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
- बहिणीला रक्तााच्या थारोळ्यात पाहून मंंगल शुद्ध हरपला. पोलिसांनी त्याला हॉस्पिटलला हलवले.
- मंगलने सेल्फ डिफेन्ससाठी खोलीत देशी कट्‍टा ठेवला होता.

पोलिस भरतीसाठी झाली होती निवड, 15 होती सब इन्स्पेक्टरची परीक्षा...
- कृष्णा अभ्यासात हुुशार होती. पोलिस भरतीसाठी तिची निवड झाल्याचे तिचे काका भानसिंह यांनी सांगितले. 15 सप्टेंंबरला होणार्‍या सब इन्स्पेक्टरच्या परीक्षेेची ती तयारी करत होती.
- रजनीश आणि अखिलेश रजकबाबत भानसिंह आणि मंगलला कोणतीही माहिंती नाही. भान सिंह यांनी सांगितले की, कृष्णा घरात कमी बोलत होती.
- पोलिस रजनीश आणि अखिलेशचा शोध घेेत आहेत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, गोळी झाडून आत्महत्या केलेल्या कृष्णाचे फोटो...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...