आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Policeman Beats And Burns Girl For Riding Bicycle

11 वर्षीय मुलीने न विचारता सायकल चालवल्याने पोलिसाने तिला जाळले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- ज्या रूग्णालयात मुलीवर सुरु आहेत तेथे बेडही नाही. त्यामुळे गादी टाकून मुलीवर उपचार सुरु आहेत.)
इंदोर- येथील एका 11 वर्षीय मुलीने आपली सायकल खेळायला घेतल्याचे पाहून एक पोलिसाला इतका राग आला की त्याने प्रथम त्या मुलीला मार मार मारले व नंतर पेटवून दिले. माझ्या सायकलला परत हात लावायचा म्हणून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर अद्दल घडविण्यासाठी तिला पेटवून दिल्याचे मुलीच्या आईने आरोप केला आहे. निम्म्यापेक्षा जास्त जळालेल्या या मुलीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना सदर बाजार भागातील सिकंदराबाद कॉलनीत गुरुवारी घडली. 11 वर्षाची यास्मीन आगीचे लोळ घेऊन ओरडत घराकडे परतताना दिसली. या मुलीला वाचविण्यासाठी कोणी तिच्या अंगावर पाणी टाकत होते तर कोणी रग टाकत होते. यानंतर शेजा-यांनीच यास्मीनला एमआय रूग्णालयात दाखल केले. तिच्यावर तेथे उपचार सुरु आहेत.
प्रत्यक्षदर्शिनी लोकांनी सांगितले की, यास्मीनच्या घराजवळ प्रकाश जारोलिया नावाचा पोलिस दलात काम करणारा व्यक्ती राहतो. गुरुवारी सायंकाळी प्रकाशची सायकल न विचारता यास्मीनने खेळायला घेतली. त्यामुळे ड्यूटीवरून आलेला प्रकाश एकदम भडकला. माझी सायकल न विचारता तू कशी काय घेतली असा सवाल करीत त्याने यास्मीनला जोरजोराने मारले. त्यानंतर थांब तुला तुरुंगात टाकतो म्हणून धमकी दिली. यास्मीन त्याच्या घरी सायकल द्यायला गेल्यानंतर थोड्यावेळाने यास्मीन जळताना घराबाहेर पडली व वाचवा वाचवा ओरडू लागली.
यास्मीनची आई रेहानाने प्रकाशने मुलीवर रॉकेल टाकून पेटवल्याचे म्हटले आहे. तिच्या आईने सांगितले की, यास्मीन 5 वीत शिकते. मी एका पक्षाच्या सभेसाठी गेले होते. त्यावेळी मला लोकांनी यास्मीनला पेटविल्याचे सांगितले. माझी मुलगी असे कृत्य करणार नाही प्रकाशनेच तिला पेटवले आहे. यास्मीनला दोन बहिणी व एक भाऊ आहे. तिच्या वडीलांचे निधन झाले आहे. घटना घडली तेव्हा यास्मीनच्या घरी कोणीच नव्हते. मुलगी बेशुद्ध आहे. त्यामुळे तिचा जबाब घेता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी प्रकाश फरार आहे. सध्या तो महिला गुन्हे शाखेत रूजू आहे.