इंदूर - येथील एका आंबटशौकीन व्यापाऱ्याच्या व्हॉट्सअॅपवर काही दिवसांपूर्वी एका अनोळखी क्रमांकावरून अश्लिल क्लिप आली. त्याने ती पाहिली तर ती स्वत:ची निघाली. त्या नंतर क्लिप पाठवणाऱ्या युवतीने (क्लिप मधील नव्हे) त्याला ब्लॅकमेल करत 11 लाख रुपये उकळले. दरम्यान, त्रस्त होऊन व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी क्लिप पाठवणारी युवती आणि तिला क्लिप देणाऱ्या युवकाला अटक केली.
आरोपी युवती आहे प्रतिष्ठित व्यापाऱ्याची मुलगी
ज्या युवतीने ही अश्लिल क्लिप पाठवून व्यापाऱ्याला ब्लॅकमेल केले ती युवती शहरातील अन्य एका प्रतिष्ठीत व्यापाऱ्याची मुलगी आहे. मात्र, ती ब्लॅकमेल करत असलेल्या व्यापाऱ्याचा आणि तिचा यापूर्वी कधीही संबंध आला नाही. तिच्याकडे ही क्लिप येताच तिने ती पीडित व्यापाऱ्याच्या व्हॉट्सअॅपवर पाठवली. येथून त्यांचा संपर्क आला.
पुढील स्लाइडवर वाचा, कशी तयार केली क्लिप....