आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसाराम बापूंच्या अटकेची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर/ भोपाळ- एका 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेले आध्यात्मिक गुरू आसारामबापूंचा जोधपूरमधील आश्रम पोलिसांनी सील केला आहे. कोणत्याही क्षणी त्यांची चौकशी केली जाण्याची, प्रसंगी त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांत बापूंविरुद्ध कलम 376 सह अत्याचाराच्या अन्य दोन कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

गुरुवारी पीडित मुलीला घेऊन पोलिस जोधपूरच्या मणाई फार्म हाऊसवर असलेल्या आश्रमात गेले. फार्म हाऊसचे मालक रणजित देवरा यांनी दिलेल्या माहितीनुसार बापू 11 ते 16 ऑ गस्टदरम्यान येथे मुक्कामी होते. 14-15 ऑ गस्टला पीडित मुलीचे कुटुंबीय आश्रमात आले होते. मात्र, मुलीच्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. 20 ऑ गस्टला मुलीची वैद्यकीय तपासणी झाली होती.

उमा भारतींनी घेतली बाजू :
भाजप नेत्या उमा भारती यांनी आसारामबापू निर्दोष असल्याचे सांगत काँग्रेसचे हे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. बापूंनी सोनिया व राहूल गांधींना केलेल्या विरोधामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप उमा भारतींनी केला. दरम्यान, याप्रकरणी नि:पक्षपातीपणे तपास केला जाईल, अशी ग्वाही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली.