आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भविष्य उजळवण्यासाठी आज तासभर अंधार, दैनिक भास्करचे वाचकांना नम्र आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - विजेचा अपव्यय आणि वातावरण बदलाविरुद्ध आज एकजूट होण्याचा दिवस आहे. आज अर्थ अवर आहे आणि भारतासह जगभरात शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० वाजेपर्यंत सर्व अनावश्यक वीज वापर बंद करण्याचा संदेश दिला जात आहे. वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरची(डब्ल्यूडब्ल्यूएफ) मोहीम अर्थ अवरशी आता दैनिक भास्करही जोडला आहे. यानिमित्त "भास्कर' आपल्या कोट्यवधी वाचकांना आज रात्री एक तास घरातील, प्रतिष्ठानातील आणि कार्यालयातील सर्व अनावश्यक लाइट बंद ठेवण्याचे आवाहन करत आहे.

वातावरण बदलासारख्या गंभीर समस्येशी लढण्यासाठी एक तासाचा अवधी खूप कमी, परंतु आवश्यक आहे. मात्र, आपले भविष्य प्रकाशमान होण्यासाठी विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचा एक तासाचा हा संदेशही तेवढाच महत्त्वाचा आहे.
या वेळची थीम "गो सोलर'
अनावश्यक लाइट तासाभरासाठी बंद ठेवून सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याचा संदेश या वेळी दिला जात आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफनुसार, भारतासारख्या देशांत, जिथे साधारण ३०० दिवस सूर्यप्रकाश असतो तिथे सौरऊर्जेचा प्रभावी वापर होऊ शकतो.

काय आहे अर्थ अवर ?
अर्थ अवर मोहिमेचा उद्देश लोकांना पर्यावरण सुरक्षेप्रती जागरूकता निर्माण करणे हा आहे. याची सुरुवात सिडनीत २००७ मध्ये झाली होती. या वर्षी या मोहिमेला सुरुवातीपेक्षा जास्त पाठिंबा मिळत आहे.
अपव्यय टाळण्यासाठी भास्करचा पुढाकार
विजेचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी दैनिक भास्कर पुढाकार घेत आहे. दैनिक भास्कर समूहाचा प्रत्येक वाचक आपल्या घरात, प्रतिष्ठानातील अनावश्यक विद्युत पुरवठा बंद करत असेल तर अनेक पट वीज बचत होईल.
मुलांना नवे शिकवण्याचा दिवस
सर्व आई-वडिलांना मुले सुसंस्कारित व्हावीत असे वाटते. मुलांना नवी शिकवण देण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अनावश्यक वीज वापर बंद ठेवण्याची शिकवण देता येईल. या तासात होणाऱ्या अंधारामुळे मुलांना विजेच्या अनावश्यक वापराविरुद्ध समज मिळेल.
जगातील १७२ देश भाग घेणार
वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरनुसार अर्थ अवर मोहिमेत या वर्षी १७२ देश सहभागी झाले आहेत. या वर्षी भारतात याचा ब्रँड अॅम्बेसेडर क्रिकेटपटू शिखर धवन आहे. देशभरात या मोहिमेस भरपूर पाठिंबा मिळत आहे. १५० पेक्षा जास्त शहरांनी यात रस दाखवला आहे. अर्थ अवर मोहिमेला अमिताभ बच्चन, हर्ष भोगले, सानिया मिर्झा यासारख्या दिग्गजांचा पाठिंबा मिळाला आहे.
बातम्या आणखी आहेत...