आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत सिंधिया घराण्याच्या सूनबाई, देशातील सर्वात सुंदर महिलांमध्ये होता समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियदर्शनी राजे सिंधिया - Divya Marathi
प्रियदर्शनी राजे सिंधिया
इंदूर - ग्वाल्हेर घराण्याची महाराणी प्रियदर्शनी राजे सिंधिया देशातील 50 सर्वात सुंदर महिलांमध्ये सहभागी होत्या. त्या एकट्याच अशा महाराणी आहेत ज्या सोशल मीडियावर अपडेट असतात. त्या नुकत्याच महेश्वर येथे आयोजित होळकर घराण्याचे वंशज युवराज यशवंत यांच्या विवाहासाठी आल्या होत्या. येथे त्यांनी divyamarathi.com सोबत चर्चा केली. आज ज्योतिरादित्य सिंधियांचा वाढदिवस आहे. त्यानिमीत्ताने याच गप्पांचा अंश खास दिव्य मराठीच्या वाचकांसाठी..

फेसबुकवर राहातात अपडेट
प्रियदर्शनी राजे सिंधिया हायटेक आहेत आणि टेक्नोसेव्ही देखील. महेश्वरमध्ये त्यांनी स्वतः सांगतिले की त्या सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. त्याचे कारण, मित्र, नातेवाईक आणि सर्वांसोबतच संपर्कात राहाता येते. माझे फेसबुक पेज मी स्वतः ऑपरेट करते. महेश्वरमध्ये होळकरांच्या विवाहसोहळ्यातील फोटो त्यांनी एफबीवर शेअर केले होते. विशेषम्हणजे, गुरुवारी रात्री 12 वाजता त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

गायकवाड मराठा राजघराण्यात झाला जन्म
खासदार ज्योतिरादित्य सिंधियांची पत्नी प्रियदर्शनी राजे यांचा जन्म गुजरातमधील बडोदा संस्थानातील गायकवाड या मराठा राजघराण्यात झालेला आहे. प्रियदर्शनी राजे यांची आई नेपाळ राजघराण्याशी संबंधीत आहे. प्रियदर्शनी राजे यांचा 12 डिसेंबर 1994 रोजी ज्योतिरादित्य सिंधियांसोबत विवाह झाला. 2012 मध्ये मिस इंडिया स्पर्धेचे आयोजक फेमिना नियतकालिकाने प्रियदर्शनी राजे यांचा समावेश देशातील सर्वात सुंदर 50 महिलांमध्ये केले होता. त्याआधी एका फॅशन मॅगझीनने त्यांचा वेल ड्रेस्ड वूमन पुरस्कार देऊन गौरव केला होता.

पॅलसचे केले राज्यातील सर्वात सुंदर हॉटेल
प्रियदर्शनी राजे केवळ महाराणी नाहीत तर त्या एक उद्योगशील महिला देखील आहेत. ग्वाल्हेर राजघराण्याचे उषाकिरण पॅलेचे रुप त्यांनी बदलले आणि त्याला राज्यातील सर्वात आलिशान हॉटेल केले, याचे पूर्ण श्रेय प्रियदर्शनी राजे यांनाच आहे. आता ताज समुहाच्या वतीने हे हॉटेल चालवले जाते. मध्यप्रदेशातील सर्वात चांगल्या हॉटेल्सपैकी ते एक आहे. याशिवाय ग्वाल्हेर हेरिटेज फांऊडेशन आणि जयविलास पॅलेस म्यूझियम ट्रस्ट देखिल आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, PHOTOS...