आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत सिंधिया राजघराण्याच्या सूनबाई, देशातील सर्वात सुंदर महिलांपैकी होत्या एक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियदर्शनी राजे सिंधिया - Divya Marathi
प्रियदर्शनी राजे सिंधिया
ग्वाल्हेर - काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव सिंधिया यांचे 30 सप्टेंबर 2001 रोजी एका दुर्घटनेत निधन झाले होते. बुधवारी त्यांचा स्मृतिदिन आहे, या निमीत्ताने divyamarathi.com त्यांच्याशी संबंधित काही माहिती आज शेअर करत आहे. या मालिकेत जाणून घेऊ या ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्याची सून अर्थात ज्योतिरादित्य सिंधिया यांची पत्नी प्रियदर्शनी राजे सिंधियांबद्दल.
प्रियदर्शनी राजे यांचा जन्म गुजरातमधील बडोद्याच्या गायकवाड घराण्यात झाला. प्रियदर्शनी राजे यांच्या मातोश्री नेपाळमधील राजघराण्याशी संबंधित आहेत. देशातील 50 सौंदर्यवती महिलांमध्ये समावेश असलेल्या प्रियदर्शनी यांचा विवाह 12 डिसेंबर 1994 रोजी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत झाला.

कोण आहेत ज्योतिरादित्य सिंधिया
30 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या विमान अपघातात माधवराव सिंधिया यांचे निधन झाले आणि ज्योतिरादित्य यांचे आयुष्य अचानक बदलले. स्टेनफोर्ड हॉर्वर्डमधून शिक्षण घेऊन आलेल्या ज्योतिरादित्य यांच्यावर वडील माधवराव यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा वारसा चावण्याची जबाबदारी येऊन पडली. माधवराव सिंधियांचा राजकीय वारस म्हणून त्यांनी गुना लोकसभा लढवली आणि देशातील तरुण खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले.
देशातील सर्वात सुंदर राजकुमारींपैकी एक
प्रियदर्शनी या देशातील सुंदर राजकुमारींपैकी एक होत्या. फेमिनाने 2012 मध्ये त्यांचा देशातील 50 सौंदर्यवतींमध्ये समावेश केला होता. 2008 मध्ये त्यांना बेस्ट ड्रेस्ड हॉल ऑफ फेम यादीतही स्थान मिळाले होते.

ज्योतिरादित्य - प्रियदर्शनी यांना दोन मुले
सिंधिया राजघराण्याच्या या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मुलाचे नाव महाआर्यमान आणि मुलगी अनन्या आहे. या दोघांचे सध्या दुन स्कुलमध्ये शिक्षण सुरु आहे, येथेच ज्योतिरादित्य यांनी देखिल शिक्षण घेतले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रियदर्शनी राजे सिंधिया यांचे फोटो..