आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जंक फूडचा प्रचार करणारच, ज्यांना आक्षेप असेल त्यांनी खाणे बंद करावे\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ (मध्यप्रदेश) - सेलिब्रेटींकडून मॅगी आणि इतर जंक फूडच्या जाहिराती करण्यावरुन झालेला वादंग अजून शमलेला नसताना बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रियंका चोपडाने, मी जंक फूडच्या जाहिराती करणार, ज्यांना आक्षेप असेल त्यांनी ते खाणे बंद करावे, असे ठाम मत व्यक्त केले आहे.
गंगाजल -2 चित्रपटाच्या शुटिंगसाठी प्रियंका मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आहे. गुरुवारी युनीसेफच्या एका कार्यक्रमात तिने बॉलिवूड कलाकारांनी जंक फूडची जाहिरात करण्यात काहीही गैर नसल्याचे म्हटले. जर कोणाला जंक फुडबद्दल तक्रार असेल तर त्यांनी ते खाणे बंद करावे असा सल्लाही तिने दिला. लोकांनी खाणे बंद केले तर आम्ही जाहिरात करणेही बंद करु अशी पुस्तीही जोडली.

माझ्या घरी लॅब नाही, त्यामुळे प्रत्येक प्रॉडक्टची टेस्ट करणे शक्य नाही
प्रियंका म्हणाली, जेव्हा आम्ही एखाद्या ब्रँडची जाहिरात करतो, त्याआधी ते प्रोडक्ट सर्वांसाठी सुरक्षित आहे ना, याची चर्चा होते. आता माझ्या घरी काही लॅब नाही, जे मी प्रत्येक प्रोडक्ट तपासून घेणार. कंपनी आम्हाला माहिती देते, त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. जर एखाद्या प्रोडक्टमध्ये काही खराबी असेल तर जाहिरात करणे बंद करतो. पण जर प्रोडक्ट विकले जात असेल तर आम्ही विकणारच. त्याबाबत जर कोणाला आक्षेप असतील तर त्यांनी तो पादर्थ विकत घेणे आणि खाणे बंद करावे.
मॅगीमुळे सेलिब्रिटी चर्चेत
नेस्ले इंडियाच्या मॅगीमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त हानिकारक पदार्थ आढळले होते. त्यानंतर या प्रोडक्टची जाहिरात करणारे बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, प्रिती झिंटा यांना टीकेचा सामना करावा लागला होता. सरकारी यंत्रणांकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यांच्याविरोधात कोर्टात याचिकाही दाखल झाल्या. त्यामुळे सेलिब्रिटींनी जंक फुडच्या जाहिराती करण्यावर प्रश्न उपस्थित झाले होते.