आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवलतीचा सिलिंडर दोन दिवसांत पुन्हा स्वस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली / भोपाळ - पेट्रोलियम कंपन्यांनी सवलतीच्या दरांतील एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढवल्यानंतर दोन दिवसांनी बुधवारी पुन्हा जुनेच दर लागू केले. ग्राहकांवरील दरवाढीचा ओझे कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा हवाला कंपन्यांनी निर्णय घेताना दिला आहे. भोपाळमध्ये सिलिंडर जुन्या किमतीला म्हणजे 453.50 पैशालाच मिळेल. एक जुले रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी त्याचे दर 5.50 रुपयांनी वाढवून 459 रुपये केले होते.

पेट्रोलियम कंपन्यांच्या म्हणण्यानुसार ही वाढ एलपीजीवर लावण्यात येणार्‍या विशेष तरतुदींमुळे केली गेली होती. त्यानुसार मध्य प्रदेश, कर्नाटक उत्तर प्रदेश व केरळमध्ये दरवाढ केली गेली होती. ही दरवाढ केंद्र सरकारच्या निर्देशांवरून करण्यात आली होती व आता ती त्यांच्याच सांगण्यावरून मागे घेण्यात आली आहे. परंतु दरम्यानच्या काळात ज्यांनी वाढीव दराने सिलिंडर घेतले त्यांना रक्कम परत दिली जाणार नाही.

जर केंद्र सरकारने तसा निर्णय घेतला तर त्याची तत्काळ अंमलबाजवणी केली जाईली, असे मध्य प्रदेश पेट्रोलियम कंपनी समितीचे समन्वयक संजीवकुमार जैन यांनी सांगितले.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)