मध्य प्रदेश स्थापना दिवस विशेष: 1 नोव्हेंबरला मध्यप्रदेशचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी divyamarathi.com राज्यातील गौरवशाली इतिहास, संस्कृती, कला, विकास आणि ऐकण्यात असलेल्या आणि नसलेल्या माहितीला तुमच्यासमोर मांडणार आहे. याच भागात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ग्वाल्हेरच्या राणी म्हणजेच ज्योतिरादित्य यांच्या पत्नी प्रियदर्शनी राजे सिंधीया यांच्याबद्दल...
ग्वाल्हेर - ज्योतिरादित्य सिंधीया यांची पत्नी प्रियदर्शनी राजे यांचा जन्म गुजरातमधील बडोद्याच्या गायकवाड मराठा राजघराण्यात झाला आहे. त्यांचे वडील कुंवर संग्राम सिंह यांचे तिसरे पुत्र होते. प्रियदर्शनीची आई नेपाळच्या राजघराण्यातील होती. प्रियदर्शनी यांचा
विवाह 12 डिसेंबर 1994 रोजी ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याशी झाला होता.
माधवराव सिंधीया यांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य महाराजा बनले
30 सुप्चेंबर 2001 ला एका विमान दुर्घटनेत माधवराव सिंधीया यांचे निधन झाले. या घटनेने ज्योतिरादित्य सिंधीया यांचे जीवनच बदलून टाकले. स्टेनफ़ोर्ड हॉवर्डमधून शिक्षण घेतलेले ज्योतिरादित्य यांच्यासमोर त्यांच्या वडीलांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी आली. महलाच्या वारस्यासोबत ज्युनिअर सिंधीया यांना त्यांच्या वडीलांची गादी संभाळावी लागली.
देशाच्या सर्वात सुंदर राजकुमारींमध्ये समावेश
प्रियदर्शनी यांचा देशातील सर्वात सुंदर राजकुमारींमध्ये समावेश होतो. 2012 मध्ये त्यांचा देशातील सर्वात सुंदर असलेल्या 50 महिलांमध्ये समावेश करण्यात आला होता. तसेच 2008 मध्ये बेस्ट ड्रेस्ड हॉल ऑफ फेमच्या यादीतही प्रियदर्शनी यांचे नाव होते.
ज्योतिरादित्य आणि प्रियदर्शनी यांना आहेत दोन मुले
या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. यातील मुलाचे नाव आर्यामन सिंधीया तर मुलीचे नाव अन्नया सिंधीया असे आहे. सध्या दोघेही दून येथील शाळेत शिक्षण घेत आहेत. याच शाळेत ज्योतिरादित्य सिंधीयासुध्दा शिकले होते.
पुढील स्लाई़डमध्ये या सिंधीया दाम्पत्याचे निवडक PHOTO