आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला सबलिकरणाशिवाय भारत महाशक्ती होऊ शकत नाही -राहुल गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारीणित प्रचारप्रमुखपदाची नवी जबाबदारी खांद्यावर आलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज (सोमवार) महिलांना सरकारकडून काय अपेक्षा आहेत ते जाणून घेत आहेत. महिलांसह युवक, शेतकरी, मागासवर्गीय, आदिवासी आणि उद्योजकांच्याही अपेक्षा जाणून घेतल्या जाणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
भोपाळमध्ये सुरु असलेल्या या कार्यक्रमात राहुल यांनी महिलांमध्ये मोठी शक्ती आहे, त्या कोणतेही काम यशस्वी पूर्ण करु शकतात. फक्त त्यांना संधी देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्याच बरोबर ते म्हणाले, मी माझी आजी (इंदिरा गांधी) आणि आईकडून (सोनिया गांधी) खूप शिकलो आहे.
काँग्रेस जाहीरनाम्याच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करण्यासाठी देशभरातून महिला आल्या असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.

महिलांच्या अपेक्षा जाणून घेण्यापूर्वी राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका मांडली. ते म्हणाले, देश महाशक्ती करायचा असेल तर महिलांचे सबलीकरण सर्वात महत्त्वाचे आहे. त्यांना शक्ती दिली तर देशाची शक्ती वाढणार आहे. तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, त्या जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. तुमच्या अपेक्षांना शक्यतेवढे स्थान जाहीरनाम्यात दिले जाईल. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर या मागण्या पूर्ण केल्या जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, तृतीयपंथी लक्ष्मीने व्यक्त केल्या व्यथा