म्हणाले, बाबासाहेबांचे स्वप्न अधुरेच...
राहुल गांधी यावेळी सभेला संबोधित करताना म्हणाले की, बाबासाहेबांनी दलितांच्या जीवनात प्रकाश आणला. त्यांचे योगदान देश आणि जातीच्या बंधनात बांधून ठेवता येणार नाही. ते अत्याचाराच्या विरोधाचे प्रतिक होते. पण त्यांचे स्वप्न आजही अधुरेच आहे. जातीयवाद आजही देशाच्या राजकारण, शिक्षण आणि समाजामध्ये खोलवर शिरलेला आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
आपल्याला जातीयवादाची भिंत पाडावी लागेल.
जातीयवादावर भाषण केंद्रीत
राहुल गांधी यांनी सुमारे 14 मिनिटे भाषण केले. त्यांचे संपूर्ण भाषण बाबासाहेबांशिवाय जातीयवादावर केंद्रीत होते. त्यांनी केंद्रावर किंवा राज्य सरकारवरही हल्ला चढवला नाही. या मंचाच्या माध्यमातून त्यांनी देशातील तरुणांना जातीयवादाच्या विरोधात आवाज उठवण्याचे आव्हान केले. राहुल म्हणाले की, कोणी म्हणतो देशाच्या विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चर गरजेचे आहे तर कोणी म्हणतो लोहमार्ग आणि रस्ते गरजेचे आहेत. पण माझ्या मते आपण जोवर समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत त्यांचे अधिकार पोहोचवत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातीयवाद पूर्णपणे दूर करायला हवा.
दोन तास उशीर झाला
स्वर्ग मैदान मंदिरावर राहुल गांधींची दुपारी तीन वाजता सभा होणार होती, पण ते 4.50 वाजता पोहोचले. त्यांच्या येण्यापूर्वी काँग्रेसच्या सुमारे 25 नेत्यांनी त्याठिकाणी भाषण केले. बहुतांश नेत्यांची भाषणे ही बरीच एकसारखी होती. बऱ्याच वेळ वाट पाहिल्यानंतरही राहुल गांधी येत नव्हते, त्यामुळे नेत्यांच्या भाषणादरम्यान लोकांनी हूटिंगही केले.