आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी गरीबांच्या विरोधात युद्ध पुकारले आहे, त्यांना फक्त बोलायचे असते; राहुल गांधी यांची टिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोएडा- दादरी येथे बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, एकही श्रीमंत व्यक्ती रांगेत उभा दिसतो आहे का? मोदींनी 8 नोव्हेंबरला गरिबांविरोधात युद्ध पुकारले आहे. काही व्यवसायीकांनी बॅंकांकडून 8 कोटींचे कर्ज घेतले आहे, जे ते वापस करत नाहीयेत. पंतप्रधान त्यांच्याकडून पैसे वापस नाही घेउ शकणार, कारण ते मोदींची मार्केटिंग करतात. त्यामुळेच त्यांनी तुम्हाला लाईनमध्ये ऊभे केले आहे. त्यांना फक्त राजा सारखे बोलायचे आहे. इकडे कोणाकडेच कॅश नाहिये .
गरिबांकडेच कॅश नाही
- मंगळवारी दादरी येथिल आनाज मंडी येथिल नागरीकांची भेट घेण्यासाठी गेले होते राहुल गांधी
- पंतप्रधान कॅशलेश देशाबद्दल बोलत आहेत, पण इथे देश आधीच कॅशलेश झाला आहे. सामान्य माणूस व्यथित आहे. असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले.
- बदलत आहेदीजी तुम्ही कॅशलेश तर करून टाकले, पण आता कोणाकडेच कॅश नाहीये. संपुर्ण देश कॅशसाठी धडपडतोय.
- देश कॅशलेश होइल तेव्हा शेतकऱ्यांना कळनारही नाही, आणि 5 टक्के रक्कम सरळ उद्योगपतींच्या खिशात जाईल.
- तुम्हाला 2 हजार मिळताहेत, आणि ज्यांना 50-100 कोटी काढायचे आहेत ते बॅंकेच्या मागच्या बाजूने काढत आहेत.
- जसे एका राजाला केवळ बोलायचे असते त्याप्रमाणे मोदींना केवळ बोलायचेच असते.

वेळे बरोबर बदलत आहे पंतप्रधानांचे बोलने
- पुढे बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, "वेळे बरोबर पंतप्रधानांचे बोलनेही बदलत आहे"
- मोदी सुरूवातीला म्हणत होते की काळ्या पैशांविरोधात लढाई आहे. त्यानंतर म्हणाले की दहशदवादाविरोधात लढाई आहे. आणि आता कॅशलेश देशाद्दल बोलत आहेत.
- जे इमानदार लोक आहेत त्यांना मोदींनी लाईनमध्ये उभे केले आहेत.
- हि परिस्थिती 50 दिवसात ठिक होणार नाही. यासाठी देशाला अनेक वर्ष त्रास भोगावा लागेल असेही राहुल गांधी यावेळी बोलतांना म्हणाले
बातम्या आणखी आहेत...