आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रेडलाइट एरियात पोलिसांचा छापा, सेक्स वर्करला बनवले कोंबडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गतीमंद सेक्सवर्कर आणि छाप्यात सापडलेल्या महिलेला भररस्त्यात पोलिसांनी शिक्षा केली. - Divya Marathi
गतीमंद सेक्सवर्कर आणि छाप्यात सापडलेल्या महिलेला भररस्त्यात पोलिसांनी शिक्षा केली.
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) - येथील शिवपुरी भागातील रेडलाइट एरियात पोलिसांच्या महिला शाखेने छापा टाकला. छाप्याची माहिती लीक झाल्याने बहुतेक सर्व कॉलगर्ल आणि ग्राहकांनी पोबारा केला होता. पोलिसांना छाप्यात एक गतिमंद सेक्सवर्कर सापडली. पोलिसांनी तिला भर रस्त्यावर कोंबडा बनवले आणि उठा-बशा करायला लावल्या. रविवारी घडलेल्या या घटनेनंतर आता मानवाधिकार कार्यकर्त्यांनी पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शिवपुरी पोलिस स्टेशनच्या महिला शाखेने येथे एका महिन्यात तिसऱ्यांदा छापा टाकला आहे. रविवारी सायंकाळी पोलिसांनी प्रत्येक घरात घुसून चौकशी केली पण त्यांना एकही संशयीत महिला वा पुरुष हाती लागला नाही. महिला शाखेच्या प्रभारी आराधना डेव्हिस म्हणाल्या, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनूसार येथे देह व्यापारासाठी मुलींना आणले जात असल्याचे कळाले होते. रविवारी येथे पॅरामिलटरी फोर्सचे जवान देखील येतात, अशीही महिती होती. मागील छाप्यात त्यांना पकडण्यातही आले होते.
खबर लीक झाली
पोलिसांची रेड पडणार असल्याची माहिती लीक झाली होती, त्यामुळे कॉलगर्ल आणि त्यांच्याकडे येणारे ग्राहक फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी कोणीच सापडले नाही. पण एका घरातील दोन महिला पोलिसांच्या हाती लागल्या. त्यातील एक गतीमंद युवती होती. पोलिसांनी त्यांच्याकडून 500 रुपये देखील जप्त केले. पोलिसांनी त्यांना तातडीने घराबाहेर काढले आणि रस्त्यावर आणून उठा-बशा काढायला लावल्या.
मानवाधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विरोध
महिलांना भररस्त्यावर अशा प्रकारची शिक्षा करण्याचा मानवाधिकार कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांचे म्हणणे होते, की पोलिसांना शिक्षा करण्याचा अधिकार नाही. तर, महिला शाखेच्या प्रभारी आराधना डेव्हिस म्हणाल्या, त्यांना समज देण्यासाठी अशी शिक्षा केली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पोलिसांच्या छापेमारी संबंधीचे फोटोज...