आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता प्रिमियम तत्काळ तिकिट मिळणार 8 वाजेपासून, कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाल - प्रीमियम तत्काळ कोट्यातील रेल्वेचे आरक्षणाचे तिकिट 8 फेब्रुवारीपासून सकाळी 8 वाजता मिळणार आहे. रेल्वेने त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये काही बदल केले आहेत. एक ते दोन दिवसांत त्याची चाचणी सुरू होणार आहे. सध्या या कोट्यातील तिकिट सकाळी दहा वाजता दिले जातात. या योजनेनुसार प्रवाशांना ऑन डिमांड लोअर बर्थही मिळेल. रेल्वेने हा बदल प्रवाशांच्या सूचनांच्या आधारे केला आहे. प्रवाशांना आणखी एक सुविधा देत IRCTC ने 200 शहरांत तिकिट बुकींगसाठी कॅश ऑन डिलिव्हरीही सुरू केली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते सध्या प्रवाशांना अधिक पैसे मोजूनही लांब रांगेत उभे राहून प्रिमियम तत्काळ कोट्यातून तिकिट घ्यावे लागत होते. प्रवाशांना होणारा हा त्रास लक्षात घेत आता प्रिमियम तत्काळ कोट्याचून सकाळी आठ वाजता बुकींग सुरू होईल.

ऑन डिमांड लोअर बर्थ
प्रीमियम ट्रेनमध्येही ऑन डिमांड लोअर बर्थ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या या रेल्वेमध्ये ऑन डिमांड लोअर बर्थची सुविधा उपलब्ध नव्हती. अनेकदा प्रिमियम ट्रेनमध्ये प्रवाशांना पाहिजे ते बर्थ उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

50 टक्के कोटा
तत्काळ कोट्यापैकी 50 टक्के सीट प्रिमियम तत्काळ कोट्यासाठी राखीव असतात. त्यांचे भाडे विमानांच्या भाड्यांप्रमाणे असते. जशी जशी जागांची संख्या कमी होत जाते, तसे भाडे वाढत असते.

पुढे वाचा, आता रेल्वे तिकिट मिळवा घरपोच...