आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेश : १४ वर्षांत ९०० घरांत बसवली जलपुनर्भरण प्रणाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छतरपूर - छतरपूरचे पर्यावरणवादी डॉ. बालेंद्र शुक्ला यांनी १४ वर्षांपूर्वी बुंदेलखंडमधील जलसंकटाची भीषणता अनुभवली होती. यावर त्यांनी रूफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम हा योग्य उपाय शोधला.

यानंतर शुक्ला यांनी संबंधित विषयाची माहिती घेण्याचे ठरवले. स्वत:सोबत अन्य लोकांनाही यात सहभागी करून घेत तंत्रज्ञानाची मदत देऊ केली. परिणामी आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम लागली आहे. या प्रणालीसाठी केवळ २ ते ४ हजार रुपये खर्च येतो. ती बसवल्यानंतर लोकांच्या विंधन विहिरींच्या पाणीपातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आणि शहर भीषण पाणी संकटातून बाहेर येऊ शकले. पाणीवाले बाबा संबोधले जाणारे डॉ. राजेंद्रसिंह यांच्याकडून प्रेरणा घेत जलपुनर्भरण मोहीम चालवणारे डॉ. शुक्ला यापुढेही हे कार्य चालू ठेवू इच्छित आहेत. एक हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा मोठ्या घराच्या प्रत्येक छतावर ही प्रणाली बसवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
बातम्या आणखी आहेत...