आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain In Malwa Region, Peoples Get Suffered, See Pics

गुलाबी गारवा, पावसात कुणी लपताना तर कुणी मस्ती करताना, बघा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदुर (मध्य प्रदेश)- मध्य प्रदेशातील काही भागांसह देशाच्या उत्तरेत ठिकठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून येत्या काही दिवसांमध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे भारताच्या उत्तरेसह महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये गारवा वाढला आहे.
मकरसंक्रांतीनंतर वातावरणातील गारवा कमी होण्यास सुरवात होते. उत्तरेतील काही राज्यांसह मुंबई, कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुरळक पाऊस पडला आहे. त्यामुळे वातावरणातील गारवा आणखी वाढला आहे. येत्या काही दिवसांमध्ये असेच वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, या अवकाळी पावसाचा काही नागरिकांनी आनंद लुटला तर काही त्यापासून पळताना दिसून आले. पुढील स्लाईडवर बघा, अशीच काही रंजक छायाचित्रे....