आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MP अजब है : या किल्ल्यात आहे परिस, जिन करतात त्याचे संरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्यप्रदेशचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमीत्ताने divyamarathi.com राज्याचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि कला याबद्दलच्या अपरिचित कथा वाचकांपुढे सादर करत आहे. भोपाळपासून 50 किलोमीटर अंतरावर रायसेन किल्ला आहे. असे म्हटले जाते की या किल्ल्यात परिस आहे आणि त्याचे संरक्षण जिन करतात.

इसवी सण 1200 मध्ये तयार करण्यात आलेला रायसेन किल्ला मध्यप्रदेशातील प्रमुख आकर्षण आहे. डोंगराच्या माथ्यावर तयार करण्यात आलेल्या या किल्ल्याची ओळख बलुआ दगडांपासून बनविण्यात आलेला प्राचीन वास्तुकलेचा नमुना म्हणून होते. एवढी शतके उलटूनही या किल्ल्याची शान अजून अबाधित आहे. या किल्ल्यात जगातील सर्वात प्राचीन वॉटर हॉर्वेंस्टिंग यंत्रणा पाहायला मिळते. या किल्ल्यावर शेरशाह सुरीचे राज्य होते. असे म्हटले जाते की येथील राजाकडे परिस होता, ज्याकशाला या दगडाचा स्पर्ष केला जात होता त्याचे सोने होत होते. या परिसासाठी युद्ध झाल्याच्याही कथा येथील ग्रामिण सांगतात. जेव्हा राजा रायसेनचा पराभव झाला, तेव्हा त्याने परिस दगड किल्ल्यावरील एका तलावात फेकून दिला असल्याची अख्यायिका आहे.
जिन करतात परिसाचे संरक्षण
असे म्हटले जाते की परिस दगडासाठी झालेल्या युद्धात राजाचा मृत्यू झाला. पण त्यांनी परिस कुठे ठेवला ते सांगितले नाही. त्यानंतर हा किल्ला एकांत होत गेला. येथे कोणी येईनासे झाले. किल्ल्याबद्दल अनेक गोष्टी चर्चिल्या जाऊ लागल्या. परिस अजूनही किल्ल्यातच असल्याचे सांगितले जाते. त्याचे संरक्षण एक जिन करतो. जे कोणी परिसाच्या लालसेने किल्ल्यात जातात त्यांची मानसिकस्थिती बिघडते,असेही म्हटले जाते.

अजूनही रात्री होते खोदकाम
किल्ल्यातील धनाचा आजपर्यंत पत्ता लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी आजही किल्ल्यात चोरून-लपून खोदकाम केले जाते.त्यासाठी गुनिया (एक प्रकारचे तांत्रिक) ची मदत घेतली जाते. त्यांच्या सल्ल्याने रात्रीच्यावेळी किल्ल्यात खोदकाम होते. किल्ला पाहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सकाळी किल्ल्यात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आणि त्याजवळ तंत्र-मंत्राचे अवशेष दिसतात.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, वास्तूकलेचा अजोड नमुना असलेल्या किल्ल्याचे आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...