आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: 3 मिनिटे केले या महिलेने नृत्य, उचलल्या पापण्यांनी जमिनीवरच्या अंगठ्या...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वालिअर (मध्य प्रदेश ) - स्पिकतर्फे काल (25/8/2014) रोजी आर्मी पब्लिक शाळेतील विद्यार्थांसमोर राजस्थानमधील रोजे खान ग्रुपने त्यांच्या खास शैलितील नृत्य सादर केले. यामध्ये महिलांनी 3 मिनिटे भवाई नृत्यासोबत साहस दाखवताना डोळ्यांच्या पापण्यांनी जमिनीवर ठेवण्यात आलेल्या अंगठ्या दोन वेळेस उचलून सगळ्यांना आश्वर्यचकित केले.
घूमर नृत्य: हे राजस्थानमधील सर्वाधिक प्रसिद्ध लोकनृत्य आहे. हे नृत्य एखास्या मंगल कार्याच्यावेळी करण्यात येते. यामध्ये ढोलनगाडा, शहनाई यांचा सुरेख संगम असतो.
कच्छी घोडी: कच्छी घोडी शेखावाटी क्षेत्राचे प्रसिद्ध नृत्य आहे. यामध्ये 4 व्यक्ती एकमेकांसमोर उभे राहून जोर-जोरत मागे-पुढे हालचाल करतात. यावेळी दिसणारे दृष्य बघण्यासारखे असते.
भवाई नृत्य: भवाई उदयपुरमधील प्रसिद्ध नृत्य आहे. यामध्ये डोक्यावर सात-आठ मटकी ठेवून नृत्य केले जाते. तसेच जमीनीवर ठेवलेला रुमाल तोंडाने उचलणे, ग्लासावर नृत्य करणे, ताटाच्या किना-यावर उभे राहून नृत्य करणे यांचा सामावेश असतो.
शंकरिया नृत्य: शंकरिया नृत्य हे कालबेलिया जातीच्या सपेरोद्वारे करण्यात येते. हे नृत्य प्रेमाच्या गोष्टीवर आधारित आहे. सध्या हे नृत्य कठपुतल्यांच्या माध्यमातून सादर करण्यात येते.
पुढील स्लाइड पाहा या नृत्याची छायाचित्रे....