आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बॉलिवूड अॅक्ट्रेसेससोबत दिल्लीत केला रँपवॉक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशोकनगर/भोपाळ- खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बुधवारी दिल्लीत रँपवॉक केला. प्रसिद्ध चंदेरी साडीला प्रमोट करण्यासाठी खास रॅंम्पवॉकचे आयोजन करण्यात आले होते. बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या साडी उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 'सेव्ह इंडिया' सारखी कंंपनी भारतात आणली.

प्रोफेशनल मॉडल्सला टक्कर देतांना दिसले सिंधिया महाराज...
- ज्योतिरादित्य सिंधिया मध्यप्रदेशातील गुना येथील खासदार आहेत.
- दिल्लीची संस्था 'एफडीसीआय'च्या वीकली प्रोग्राममध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत बॉलीवुड अॅक्ट्रेस अदिति राव आणि इतर मॉडल्सनी रँम्पवॉक केला.
- ज्योतिरादित्य यांनी प्रोफेशनल मॉडल्सला टक्कर दिली.
- ज्योतिरादित्य यांनी शुभ्र कुर्ता-पायजामा आणि डार्क जॅकेट परिधान केला होता. 'द रोड टू चंदेरी' अशी या प्रोग्रामची थीम होती.

बंद होण्याच्या मार्गावर होता साडी उद्योग...
- चंदेरी साडी उद्योग साल 2002 मध्येच बंद होण्याच्या मार्गावर होता. हातमाग कामगारांनी या उद्योगाला रामराम ठोकला होता. ते दुसरा व्यवसाय करु लागले होते.
- सिंधिया यांनी 'वर्ल्ड हँडलूम'वर काम करणारी कंपनी 'सेव्ह इंडिया'आणली आणि साडी उद्योगाला नवसंजीवनी मिळाली.

करीना कपूरने चंदेरी साडी परिधान करून केले होते प्रमोट...
- 2009 मध्ये करीना कपूरने देखील चंदेरी साडीला प्रमोट केले होते.
- करीनाद्वारा चंदेरी साडीचे प्रमोशन केल्यानंतर साडीच्या विक्रीत 25 टक्के वाढ झाली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बॉलिवूड अॅक्ट्रेसेससोबत दिल्लीत रँपवॉक करताना सिंधिया महाराजांचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...