जबलपूर - मुघल सम्राट अकबराला मध्य भारतात आपला विस्तार करायचा होता. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी राणी दुर्गावतींकडे पाठवला. जर आडकाठी करण्यात आली तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही बजावले. मात्र राणी दुर्गावतींनी अकबराचा प्रस्ताव धुडकावून लावला आणि युध्दाला सज्ज झाली. युध्दात जखमी झाल्यानंतर राणीला डोळ्यापुढे पराभव दिसू लागला. मात्र जिवंतपणी अकबरला शरण जायचे नाही, त्याच्याकडून पराभूत व्हायचे नाही असे ठरवून राणीने स्वतःच्या शरीरावर कट्यारीने वार केले. 5 ऑक्टोबर रोजी राणी दुर्गावती यांची जयंती आहे. यानिमित्त DivyaMarathi.com या रणरागिणीची कथा सांगत आहे.
ज्या दिवशी राणी दुर्गावतींचा जन्म झाला तो दिवस होता दुर्गाष्टमी (5 ऑक्टोबर 1524). यामुळे त्यांचे नाव दुर्गावती ठेवण्यात आले. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बांदा (कालांजर) येथे झाला होता. 1542 मध्ये त्यांचा विवाह दलपत शहा यांच्याशी झाला. शहा हे गोंड राजा संग्राम शहा यांचे थोरले सुपूत्र होते. विवाहानंतर काही वर्षांनी दलपत शहा यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचा मुलगा वीरनारायण लहान होता. अशा स्थितीत राणी दुर्गावतींना राज सिंहासन सांभाळावे लागले. त्या एका गोंड राज्याच्या पहिल्या राणी झाल्या. सम्राट अकबराला वाटत होते, की मुघल साम्राज्याच्या नियंत्रणाखाली राणीने राज्य करावे. त्यांनी राणी दुर्गावतींवर दबाव टाकला. परंतु महाराणी दुर्गावतींनी अकबराचे अधिपत्य मान्य केले नाही आणि युद्धाची तयारी केली.
पुढील स्लाइड्सवर, सम्राट अकबराच्या सैन्याला कळत नव्हते कुठून येत आहे बाण...