आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

75 वर्षांचा निवृत्त प्राध्यापक मुलींसोबत करायचा कुकर्म, असे उघड झाले वासनाकांड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवपुरी (मध्य प्रदेश) - अनाथाश्रमात राहणाऱ्या पाच मुलींसोबत ७७ वर्षे वयाच्या प्राध्यापकाने बलात्कार केल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले. हा अनाथाश्रम त्याची मुलगी चालवत होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पेशाने वकील असलेल्या संचालिकेस अटक केली. आराेपी फरार असून तो मध्य प्रदेशातील शिवपुरीचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला परमार्थ समितीच्या माधव बालगृहात १० ते १६ वर्षे वयाच्या मुलींची काउन्सेलिंग करण्यात आली. आश्रमाची संचालिका अॅड. शैला अग्रवाल हिचे प्राध्यापक असलेले ७७ वर्षांचे वडील के. एन. अग्रवाल मुलींशी अश्लील चाळे करत असतात, अशी माहिती या मुलींनी दिली. आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रारही या पाच मुलींनी केली. यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात या ५ मुलींवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पितापुत्रीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. शैला अग्रवालला अटक करण्यात आली तर के. एन. अग्रवालला फरार घोषित करण्यात आले.

पळून जाणाऱ्या दोन मुलींमुळे प्रकरण उघडकीस : १ ऑक्टाेबर रोजी या अनाथाश्रमातून दोन मुली पळून गेल्या होत्या. त्यांना पोलिसांनी पकडले होते. बाल संरक्षण समितीच्या सदस्या उमा मिश्रा यांनी या मुलींची काउन्सेलिंग केली. तेव्हा एकीने आपल्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यानंतर बाल संरक्षण विभागास ही माहिती कळवण्यात आली.

दारूच्या बाटल्या जप्त : माधव अनाथाश्रमात पोलिसांनी घातलेल्या छाप्यात एका कपाटातून उच्च प्रतीच्या महागड्या दारूच्या ५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. संचालिका शैला अग्रवालला अटक करण्यात आली, तर के. एन. अग्रवाल फरार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नराधम पित्याला साथ देत होती शैला अग्रवाल..
बातम्या आणखी आहेत...