आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape In Railway Women Raised Complaint On Mobil App

रेल्वेत छेडछाड, महिलेची अॅपवर तक्रार; एक जेरबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/पाटणा - नवी दिल्ली-बिलासपूर राजधानी एक्स्प्रेसमध्ये लहान मुलासह प्रवास करणाऱ्या २५ वर्षीय महिलेची लष्करातील लान्सनायक कमलेश प्रसादने मंगळवारी रात्री छेड काढली. महिलेने त्याचे छायाचित्र काढून जीआरपी हेल्पलाइन अॅपवर पाठवले. नंतर दोन तासांतच प्रसादला पोलिसांनी पकडले.
रेल्वेच्या बी-२ डब्यात मद्य घेतलेल्या लान्सनायकाने "तुम्हाला मी स्पर्श करू शकतो का?' असे महिलेला विचारले. विरोधानंतरही तिच्याजवळ बसून त्याने विनयभंग केला. महिलेच्या मोबाइलमध्ये जीआरपी हेल्पलाइन अॅप डाऊनलोड होते. मोबाइलमध्ये छायाचित्र काढून तिने अॅपवर टाकले. लगेच भोपाळ जीआरपी ठाण्यातून महिलेस फोन गेला. भाेपाळ येताच पोलिसांनी लान्सनायकास पकडले.

दरम्यान, पाटणा संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये महिलेचा हात धरून छेड काढणारा अासाम रायफलचा जवान सुधीरसिंहला पोलिसांनी अटक केली. गर्दीमुळे महिलेला धडकलो, असे या जवानाने म्हटले आहे.