आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ratangarh Temple Stampede Madhya Pradesh Latest News

रतनगड मंदिर चेंगराचेंगरी : \'भावाचा मृतदेह मागायला गेलो पोलिसांनी नदीत फेकून दिले\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दतिया (ग्वाल्हेर) - दातिया येथील प्रसिद्ध माता मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीनंतर राजकारण सुरू झाले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस महासचिव दिग्विजयसिंह यांनी या दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. या घटनेतील पोलिस प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घटनेच्या न्यायालयिन चौकशीचे आदेश दिले असून ते आज (सोमवार) घटनास्थळाचा दौरा करणार आहेत.

मध्य प्रदेशात दतिया येथील प्रसिद्ध रतनगडच्या माता मंदिराजवळ रविवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 200 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी लाठीमार केल्याने तसेच सिंध नदीवरील पूल कोसळल्याची अफवा पसरल्याने भाविकांत गोंधळ उडाला. काही लोकांनी नदीत उड्या टाकून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अनेकांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी उशिरा रात्री 89 लोकांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र 113 मृतदेह हाती लागले आहेत, 200 पेक्षा जास्त जण जखमी आहेत. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मृतांचा आकडा लपवण्यासाठी पोलिस कर्मचा-यांनी अनेक मृतदेह नदीमध्ये फेकून दिले. प्रत्यक्षदर्शींचा आरोप आहे की, पोलिस कर्मचा-यांनी मृतदेह फेकून देण्याआधी त्यांच्या आंगावरील दागिने आणि खिशातील पैसे काढून घेतले. भिंड येथील रहिवाशी गीता मिश्र यांनी सांगितले, 'गोंधळ उडाला तेव्हा मी पुलावर होते. पोलिस कर्मचा-यांनी अनेक मृतदेह नदीत फेकून दिल्याचे मी स्वतः पाहिले आहे. त्यातील काही जिवंत देखील होते.' या दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेला 15 वर्षांचा आशिष सांगतो, 'मी माझ्या पाच वर्षांच्या भावाचा मृतदेह घेण्यासाठी गेलो तेव्हा पोलिसांनी मला पुलावरून धक्का देऊन नदीत फेकले.' 20 फूटांवरून खाली कोसळलेला आशिष गंभीर जखमी आहे.

पुढील स्लाइडमध्ये, सिंध नदी पूलावरील भयावह दृश्य