आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Real Life Anand, From 10 Years Fighting From Cancer

PICS : खरेच, 'जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं!’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - सत्तरच्या दशकात ‘आनंद’ हा चित्रपट आला होता. त्यात सर्व काही अविस्मरणीय होते. मृत्यूशी झुंज देत जीवनाचा ‘आनंद’ घेत असलेल्या आनंदचा (राजेश खन्ना) अभिनय असो की त्याच्या तोंडी असलेले गुलजार यांचे संवाद. काही संवाद तर आमच्यापैकी कित्येक जणांना आजही मुखोद‌्गत असतील. चित्रपटातील आयुष्य जगणारा आनंद प्रत्येकाला आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगत असतो, ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं।’

काहीसे असेच तत्त्वज्ञान आहे वास्तव आयुष्य जगणार्‍या ‘आनंद’चे. भोपाळचे प्रदीप सक्सेना. ‘शेवटचा टप्पा आहे. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाहीत,’ असे डॉक्टरांनी सांगितले आणि त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. त्या वेळी ते ४७ वर्षांचे होते. पण त्याच वेळी त्यांनी ठरवले होते, ‘मृत्यूच्या आधी मरायचे नाही.’ त्यामुळे मृत्यूच्या डोळ्याला डोळा भिडवून ते जगत राहिले व विजयीही झाले. डॉक्टरांनी जे सांगितले होते त्याला आता १० वर्षे झाली आहेत. सध्या ते ५७ वर्षांचे आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत २२ शस्त्रक्रिया, १८ वेळा बायोप्सी झाली आहे.

संपूर्ण शरीरात कॅन्सर पसरला आहे. शरीरात इतर १० व्याधींनीही घर केले आहे. जेवण करू शकत नाहीत. फक्त द्रवपदार्थ घेतात. पण चेहर्‍यावर तक्रारीचे सूर नाहीत. नेहमी हसरा चेहरा. रोज सकाळी सात वाजता उठतात. स्वत: कार चालवत कार्यालयात जातात. ते केंद्रीय अबकारी आणि जकात विभागात अधिकारी आहेत. ऊर्जा एवढी की आरोग्यवान व्यक्तीपेक्षा जास्त तंदुरुस्त दिसतात. त्यामुळे उपचार करणारे डॉक्टरही त्यांच्या या विजिगीषू वृत्तीची प्रशंसा करतात. सहायक आयुक्त त्यांना ‘चालतेबोलते आश्चर्य’ म्हणतात.

बालपणापासून आजार...
प्रदीप यांना बालपणी पोलिओ झाला. ३१ व्या वर्षी डावा हात निकामी झाला. २००१ मध्ये अन्ननलिकेत अडथळे आले. २००५ मध्ये पाठीच्या कण्यात वेदना सुरू झाल्या. ट्यूमर असल्याचे २००८ मध्ये समजले. बायोप्सीत हाडाचा कर्करोग निघाला. नंतर हृदयात ब्लॉकेज झाले. २०१२ मध्ये झटके येण्यास सुरुवात झाली. एमआरआयमध्ये ब्रेन ट्यूमर असल्याचे समजले. आता यकृत, स्वादुपिंड आणि प्रोस्टेट कॅन्सरही असल्याचे निदान झाले.

पुढील स्लाइड्समध्ये पाहा PHOTOS......