आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे तयार होते सुप्रसिद्ध इंदौरी फरसाण, हे बघितल्यावर तुम्ही खाणे सोडाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर/खंडवा (मध्य प्रदेश)- प्रचंड अस्वच्छता, नाल्याचे पाणी, घोंगावणाऱ्या माशा, खराब कपडे घालून आचारी, आरोग्याला अपायकारक तेलाचा वापर, जमिनीवर ठेवलेला तयार माल इत्यादी इत्यादी. हे चित्र आहे इंदूरच्या प्रसिद्ध फरसाण कारखान्याचे. केवळ 30-40 रुपये खर्च करुन येथे एक किलो फरसाण तयार केले जाते. त्यानंतर 100 ते 120 रुपये किलो या दराने बाजारपेठेत आणि इतर शहरांमध्ये विकले जाते. काही फरसाण महाराष्ट्रातही विक्रीसाठी पाठवले जाते. अन्न व औषधी प्रशासन विभागाने या कारखान्यावर छापा मारला तर या फरसाणामागचे सत्य उघडकीस आले. त्यानंतर सर्वांना धक्काच बसला.
कारखान्यात फिरत होते गावठी डुक्कर, कुत्री
- दैनिक भास्करची टीम या ठिकाणी पोहोचली तर कारखान्याच्या बाहेर मिर्च्यांचा ढिग लावलेला होता. बाहेरुन आत 10-15 गावठी डुक्कर फिरत होते.
- आचाऱ्यांनी अत्यंत खराब कपडे घातले होते. फरसाण तयार करताना त्यांना प्रचंड घाम येत होता. पिठ, मैदा आणि तेलात तो पडत होता. पायांच्या नखांसह केसांपर्यंत जवळपास सर्वच पिठात दिसत होते.
- मोठ्या कढईच्या शेजारी असलेल्या पिठात नाल्यातून वाहत येत असलेल्या नळाचे पाणी मिसळण्यात येत होते.
- दाळीची पिठ, तेल, मटार, लाल मिरची पावडर, प्रतिबंधित दाळ, पामोलीन तेल आदींचा वापर करुन शेव आणि आलू चिप्स तयार करण्यात येत होते.
- भास्करची टीम गेली तर तेथील कामगारांनी सेठला फोन लावला. त्यांना कारखान्यात बोलावून घेतले.
- दोन मिनिटात कारखान्याचा मालक दिनेश सैनी आला. 5-7 हजार रुपयांचा नोटांचा बंडल देत म्हणाला गेल्या तीन वर्षांपासून माझे हे काम सुरु आहे. येथे अधिकारी येतात-जातात. सर्वांना माहिती आहे शेव-फरसाण कसे तयार केले जाते. तुम्ही मला समजून घ्या. मी सर्वांना समजून घेतो.
- पुढे तो म्हणाला, येथे ओले-गोले (फुड अधिकारी राधोश्याम गोळे) सगळे येतात. तुम्ही पण ही रक्कम घ्या. जाऊद्या. हे असेच चालते.
- पण टीमने नकार देताच त्याने काही जणांना फोन लावले. हे प्रकरण सांभाळून घ्या असे सांगितले.
सैनीकडे नाही परवाना
- मुळचा राजस्थानचा असलेला दिनेश सैनी याचा हा कारखाना आहे. त्याच्याकडे याचा परवानाही नाही. त्याला याबाबत विचारणा केली तेव्हा त्याने एका व्यक्तीला फोन लावला. वेळ मारुन घेतली. पण परवाना काही दिला नाही. त्याचे शहरात एक शॉपही असल्याची माहिती मिळाली आहे. एवढ्या वर्षांपासून परवाना नसतानाही तो अगदी बिनदिक्कतपणे हा कारखाना चालवत होता.
असे तयार केले जात होते नमकीन
चण्याची दाळ सध्या 140 रुपये किलो आहे. त्यामुळे त्याऐवजी मक्क्याचे पिठ, मैदा याचा वापर करुन शेव आणि नमकीन तयारकेले जात होते. तळण्यासाठी 40 ते 45 रुपये किलो रायडा तेल, पाम ऑईल, काकडा तेल आणि नमकीनला लाल करण्यासाठी रंगाचा वापर केला जात होता. रायडा तेलाचे वैशिष्ट्य हे आहे, की ते जळत नाही. त्यामुळे कमी तेलात जास्त तळण केले जाते.
पुढील स्लाईडवर बघा, कसे तयार केले जात होते फरसाण, नमकीन... अशी तळली जात होती शेव...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...