आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reservation Ticket Now Also In Train By Hand Held Machine News In Marathi

रिझर्व्हेशनची च‍िंता सोडा, प्रवास सुरु केल्यानंतर रिझर्व्ह करा तुमचे Seat

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसौय आणि प्रवासादरम्यान टीटीई आणि आरपीएफकडून होणारी बेकायदा वसुली थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस पाऊले उचलली आहेत. वेटींग लिस्ट आणि रिझर्व्हेशन करू न शकलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने एक नवी योजना सुरु केली आहे. योजनेनुसार, प्रवासी आपला प्रवास सुरु करून टीटीईकडून आपले सीट रिझर्व्ह करून घेऊ शकतात.

नव्या सुविधेनुसार टीटीईकडे एक हँड हेल्ड मशीन देण्यात येणार आहे. या मशीनवर डब्यातील रिकाम्या बर्थची संपूर्ण माहिती टीटीईला समजेल. वेटींग लिस्ट प्रवाशांना बर्थ तत्काळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. टीटीईकडे सध्या फक्त रिझर्व्हेशनचा चार्ट असतो. आता मात्र, एखाद्या प्रवाशीने ऐनवेळी त्याचे तिकिट रद्द केले असेल तर त्याची माहिती थेट हेल्ड मशीनवर दिसेल.

सध्या ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली आहे. 'गरीब रथ' एक्स्प्रेसमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही योजना यशस्वी ठरली आहे. रेल्वे मंत्रालयाचे आदेश मिळतातच सर्व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. एक्स्प्रेस गाड्यांमधील टीटीईला तिकिट मशीन (हँड हेल्ड) देण्यात येणार आहे. हे मशीन थेट रेल्वे पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (पीआरएस) सर्व्हरशी कनेक्ट असणार आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून, थांबेल बेकायदा वसुली...