आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवृत्तीचे वय 62 करण्याची तयारी, उद्या लाल किल्ल्यावरून घोषणा होण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - केंद्र सरकार आपल्या कर्मचार्‍यांचे निवृत्ती वय 60 वरून 62 वर आणण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) सोमवारी याबाबतच्या प्रस्तावाला अंतिम रूप दिले. सूत्रांनुसार, पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडून 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरील भाषणात याबाबतच्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये पाच राज्यांच्या निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे. यामुळे आचारसंहितेपूर्वीच सरकार कर्मचार्‍यांना खुश करण्याच्या प्रयत्नात आहे. डीओपीटीने 1 ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव कॅबिनेटकडे पाठवला होता. मात्र त्यावर प्रश्नचिन्ह उभे करत तो लांबणीवर टाकला गेला.