आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या मृतदेहाजवळ धायमोकलून रडत होता भाऊ, निपचीत पडलेली आई पाहात राहिले चिमुकले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - शाजापूरमध्ये रस्ते अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. महिला रक्षाबंधनानंतर भावासोबत सासरी निघाली होती. यावेळी ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेने महिला उंच उडाली आणि ट्रकच्या चाकाखाली येऊन तिचा चेंदामेंदा झाला. बहिनीचा मृतदेह पाहून भावाची जणू शुद्ध हरपली. बहिणीच्या निपचीत देहाकडे पाहून तो फक्त एवढेच म्हणत होता, की देवा बहिणी ऐवजी मला उचलले असते...  दुर्घटनास्थळावरील दृष्य एवढे भयावह होते की तिथे उपस्थित लोकांनी नजरा दुसरीकडे वळवल्या. 

- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रंथभंवर येथील रहिवासी जितेंद्र मीणा हा आते बहिण ममता (25) हिला घेऊन तिचे सासर नानूखेडी येथे निघाला होता. 
- शाजापूर येथील राजराजेश्वरी मंदिराजवळ मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने बाइकला जोरदार धडक दिली. 
- भावाच्या दुचाकीवर मागे बसून निघालेली ममता रस्त्यावर निपचीत पडलेली होती. तिचा छिन्न-विछिन्न मृतदेह पाहून भाऊ जणू वेडा झाला होता तर तिची दोन्ही मुले आईच्या मृतदेहाकडे पाहून आसवं ढाळत होती. 
- अपघातानंतरचे दृष्य भयावह होते. तिथे उपस्थित लोकांनाही ते दृष्य पाहावत नव्हते. घटनास्थळी पोहोचलेल्या वाहतूक पोलिसांनी मृतदेह जिल्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचवला. यावेळी अर्धा तास एबी रोडवरील वाहतूक बंद होती. 
- ट्रकने मागून धडक दिल्यानंतर महिला बाइकवरुन उडाली आणि ट्रकच्या समोर पडली. ट्रक भरधाव वेगात असल्याने त्याची चाके महिलेवरुन गेली. 
 
ममताला दोन चिमुकले 
- रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या ममताचा सासरी परत जाताना दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेला आईचा मृतदेह पाहून ममताचा चार वर्षांचा मुलगा धायमोकलून रडत होता. 
- ममताचा चार वर्षांचा मुलगा कृष्णा बोबड्या बोलात आईजवळ जाण्याचा हट्ट करत होता. त्याला काय समजवावे हे जितेंद्रला कळत नव्हते. 
- हे दृष्य पाहून बघ्यांच्या डोळ्यातूनही पाणी येत होते. 
- दोन वर्षांची निक्की या चिमुकलीला तर काय झाले आहे ते काहीच कळत नव्हते. आई बोलत नाही, एवढेच काय तिला कळत असावे, अशी बघ्यांमध्ये चर्चा होती. 
- कृष्णा आणि निक्की या दोन्ही चिमुकल्यांना कवटाळून भाऊ जितेंद्र देवा मला का नेले नाही, असा टाहो फोडून रडत होता. आता या मुलांकडे कोण पाहिल असे तो म्हणत होता. 
- बहिणीच्या मृत्यूला आपणच जबाबादर असल्याचे मानत जितेंद्रच्या डोळ्यातील अश्रू थांबता थाबंत नव्हते.    
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दोन चिमुकल्यांसह जितेंद्र... 
 
बातम्या आणखी आहेत...