आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्स घेऊन पळणाऱ्या चोराचा पाठलाग करताना माय-लेकीने घेतली रेल्वेतून उडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोरांमागे धावताना जखमी झालेल्या माय-लेकी - Divya Marathi
चोरांमागे धावताना जखमी झालेल्या माय-लेकी
भोपाळ - नर्मदा एक्स्प्रेसने प्रवास करत असलेल्या माय-लेकींनी पर्स घेऊन पळ काढणाऱ्या चोराचा पाठलाग करताना रेल्वेतून उडी मारली. यात दोघीही जखमी झाल्या. त्यांना हमीदिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भोपाळ रेल्वे पोलिस चोराचा शोध घेत आहे.
बिलासपूरहून इंदूरला जात असलेल्या नर्मदा एक्स्प्रेसच्या एस- 8 कोचमध्ये अंजना तिवारी आणि तिची आई आशा झोपलेल्या होत्या. आशा यांच्या उशाला पर्स ठेवलेली होती. त्यात 38 हजार रुपये होते.

बैरागड आउटर येथे रेल्वे थांबलेली असताना झटका बसल्याने त्यांचे डोळे उघडले. त्यांनी पाहिले की एक तरुण त्यांची पर्स घेऊन पळत आहे. आशा चोरा मागे धावल्या. आईला ओरडताना पाहून अंजनाही त्याच्या मागे धावली. अंजनाला वाटले रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबलेली आहे. चोरामागे तिनेही रेल्वेतून उडी घेतली. मुलीमागे तिच्या आईनेही उडी टाकली.
जखमी अवस्थेत अंजना घटनेची माहिती देण्यासाठी स्टेशनपर्यंत गेली. स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी युवती आणि तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

रेल्वे पोलिस काय म्हणाले
- रेल्वे पोलिस अधीक्षक अवधेश गोस्वामी म्हणाले, आई-मुलगी झोपलेल्या असल्याने त्यांनी चोराचा चेहरा पाहिला नाही. आम्ही त्यांना काही चोरांचे फोटो दाखवले मात्र त्या त्याला ओळखू शकल्या नाही. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी चोरांचा शोध सुरु केला आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, फोटोज्...