आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 व्या वर्षीच झाले होते IPS, हा प्लॅन फॉलो करून बनवले पीळदार शरीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IPS सचिन अतुलकर सध्या सागर (मध्यप्रदेश)चे एसपी म्हणून कार्यरत आहेत. - Divya Marathi
IPS सचिन अतुलकर सध्या सागर (मध्यप्रदेश)चे एसपी म्हणून कार्यरत आहेत.
भोपाल/सागर - IPS सचिन अतुलकर फिटनेसच्या बाबतीत पोलिस डिपार्टमेंटच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आयकॉन आहेत. सध्या ते सागरचे एसपी म्हणून कार्यरत आहेत. सचिन वयाच्या 22व्या वर्षीच IPS बनले होते. ते जेथेही जातात तरुण-तरुणी त्यांना सेल्फी घेण्याची रिक्वेस्ट करतात. आपल्या एवढ्या व्यग्र कामातूनही ते व्यायामाला नियमित वेळ देतात तसेच योगाही करतात, हेच त्यांच्या उमद्या फिटनेसचे रहस्य आहे. ते नेहमी इतरांना फिट राहण्याची प्रेरणाही देतात. 21 जून रोजीच्या योग दिनानिमित्त या सर्वात फिट आयपीएसविषयी आपण जाणून घेऊ...
 
पहिल्याच प्रयत्नात IPS
- सचिन अतुलकर 2007 बॅचचे पासआऊट आहेत. वयाच्या 22व्या वर्षीचे ते IPS बनले.
- त्यांनी पदवीनंतर पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले.
- IPS सचिन यांचा जन्म भोपाळमध्ये झाला. त्यांचे वडील वनसेवेतून निवृत्त असून भाऊ लष्करात आहे.
- 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट  खेळलेले आहे तसेच त्यांना 2010 मध्ये सुवर्णपदकही मिळालेले आहे.

रोज न चुकता व्यायाम करतात IPS सचिन
-IPS झाल्यानंतरही सचिन यांनी रोज व्यायामासाठी वेळ दिला आणि आज ते सर्वांसाठी आदर्श ठरले आहेत.
- शरीरयष्टी कमावण्याचा निश्चय केल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घेतले. यामुळे ते परफेक्ट बॉडी बनवण्यात यशस्वी झाले. ते रोज व्यायाम करतात आणि योगालाही वेळ देतात.
- त्यांचे मते, व्यायामामुळे ताणतणाव दूर होतो आणि मेंदूही तल्लख राहतो. यामुळे ते अधिक चांगल्या रीतीने कर्तव्यास तप्तर असतात.
- IPS सचिन म्हणतात की बॉडी बिल्डिंगमुळे एक चांगले व्यक्तिमत्त्व बनते, मानसिक आणि शारीरिक विकास होतो.
 
हे वेळापत्रक फॉलो करून बनवली पीळदार बॉडी
-IPS सचिन आपल्या फिटनेससाठी 7 दिवस हा प्लॅन फॉलो करतात आणि यानुसारच व्यायाम करतात.
1 day - चेस्ट आणि ट्रायशेपची एक्झरसाइज करतात.
2 day - बॅक आणि  ट्रायशेपची एक्झरसाइज करतात.
3 day- कार्डियोचीसुद्धा एक्झरसाइज करतात.
4 day- पायांसाठी स्ट्रेचिंग आणि रिलेक्सिंग करतात.
5 day- कार्डियो एक्झरसाइज करतात.
6 day- या दिवशी शरीराच्या सर्वात कमजोर भागासाठी काही वेळ देतात.
7 day- या दिवशी काहीच करत नाहीत. मेंदू आणि शरीराला आराम देतात.
 
घोडेस्वारीत जिंकले आहे सुवर्णपदक
- 8 ऑगस्ट 1984 रोजी भोपाळमध्ये जन्मलेल्या सचिन यांच्या कुटुंबातच व्यायामाची आवड आहे.
- शालेय जीवनात ते अभ्यासासोबतच खेळातही पुढे होते.
- खेळात विशेष आवड असल्याने 1999मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर क्रिकेटही खेळलेले आहे.
- क्रिकेटशिवाय आयपीएस ट्रेनिंगदरम्यान घोडेस्वारीचाही त्यांना छंद जडला. 2010मध्ये राष्ट्रीय स्तरावर झालेल्या शो जंपिंगमध्ये त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा IPS सचिन यांचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...