आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन तेंडुलकरने कोणत्या नियमाचे उल्लंघन केले?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर - मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या भारतरत्न पुरस्काराला आव्हान दिल्याप्रकरणी पुरस्कारप्राप्त व्यक्तींसाठी बनवण्यात आलेली नियमावली सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायपीठाने याचिकाकर्त्याला विचारले, तुम्ही कोणत्या नियमाच्या आधारे सचिनकडून भारतरत्न माघारी घेण्याची मागणी केली आहे. भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्ती एखाद्या कंपनीची जाहिरात करू शकत नाही असा कोणता नियम आहे काय? न्यायालयाने याचिकाकर्त्याला म्हणणे मांडण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. भोपाळचे व्ही. के. नसवा यांनी जनहित याचिका दाखल करून भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सचिनने मोठमोठ्या कंपन्यांसाठी जाहिरात केली आणि त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग केल्याचे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...