आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sachin Tendulkar To Lose His Bharat Ratna? Madhya Pradesh High Court Admits Plea For Misuse Of Honour

सचिन तेंडुलकरचा "भारतरत्न' परत घ्या : काेर्टाने याचिका स्वीकारली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर- क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरकडून भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची याचिका मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. सचिनने या सन्मानाच्या प्रतिष्ठेचा वापर व्यावसायिक उत्पादनांच्या प्रचारासाठी करून पैसा कमावल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून अतिरिक्त सॉलिसिटर जनरलना सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले. भोपाळ येथील व्ही. के. नासवाह यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर मुख्य न्यायाधीश ए. एम. खानविलकर व न्यायमूर्ती केे. के. त्रिवेदी यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे. तेंडुलकर लोकप्रिय आहे. पण त्याचा वापर त्याने जाहिरातीसाठी केला.

त्याने क्रिकेटमध्ये देशासाठी अनेक विक्रम निर्माण केले. परंतु देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाच्या प्रतिष्ठेचा उपयोग तो व्यावसायिक उत्पादनांच्या प्रचारासाठी करू शकत नाही, असा याचिकाकर्त्याचा आक्षेप आहे.