आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुस्लिम गायिकेच्या आवाजाचे दिवाने आहेत हिंदू, बॉयफ्रेंडची केली होती हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहनाज अख्तर - फाइल फोटो - Divya Marathi
शहनाज अख्तर - फाइल फोटो
जबलपूर - संपर्ण देशात नवरात्रोत्सवाची धूम आहे. नवरात्रीच्या मंडपात जसा दांडियांच्या तालावर ठेका धरला जात आहे तसा भजन सिंगरचा आवाजही कानावर पडत आहे. यात आघाडीवर आहे शहनाज अख्तर. नवरात्रीमध्ये शहनाजचा आवाज सर्वच कानसेनांना तृप्त करत आहे. मग त्यात हिंदू आणि मुस्लिम असा भेदाभेद नाही. जेव्हा शहनाज मंचावरुन गायला सुरुवात करते तेव्हा लोक तिचे चरण स्पर्ष करतात. तिच्या गायकीमुळे तिच जेवढ्या उजळ माथ्याने फिरते तिवढाच काळा तिचा इतिहास आहे. 2009 मध्ये आपल्या बॉयफ्रेंडच्या हत्येत तिला अटक झाली होती. या प्रकरणात तिला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सध्याती जामिनावर तुरुंगाबाहेर आहे.
शारदीय नवरात्रोत्सव असेल नाही तर इतर काही समारंभ उत्तर भारतातील हिंदी पट्टयात शहनाजचे भजन अवश्य होत असते. जणू लोक तिच्या आवाजाचे दिवाने आहेत. उत्सवकाळात तिच्या व्हिडिओ अल्बमची मागणी अचानक वाढायला लागते. एका मुलाखतीत शहनाजने सांगितले होते, की मी कोणाकडूनही भजन गाण्याचे शिक्षण घेतलेले नाही. घरात टेपरेकॉर्डरवर गाणी ऐकत मी गाण्याचा अभ्यास केला. दुर्ग येथील बरघाट गावातील शहनाजने वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. 2005 मध्ये तिचा पहिला अल्बम रिलिज झाला. त्यानंतर तिला भजन गाण्यासाठी मागणी वाढली. आतापर्यंत तिचे 75 अल्बम प्रसिद्ध आहेत.
बॉयफ्रेंडच्या हत्येचे प्रकरण
मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील कुरई गावाजवळ पोलिसांना एका 19 वर्षांच्या युवकाचा मृतदेह आढळला होता. पोलिस तपासात समोर आले होते, की हा तरुण भजन गायिकेचा प्रियकर होता. त्यानंतर पोलिसांनी शहनाजसह तिचा पती एजाज सहकारी इनामुल हक, प्रशांत सोनी, मोहित यादव यांन अटक केली होती. शहनाज आणि तिच्या पेक्षा वयाने खूप लहान अझहरसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्याशिवाय दोघांमध्ये लाखो रुपयांची देवाण-घेवाण देखील झाल्याचे समोर आले होते. अझहर आणि शहनाज नियमीत भेटत होते. हे तिचा पती एजाजला पसंत नव्हते. शहनाजचा पती आणि दिरांनी तिला लाडीगोडी लावून अझहरला बोलवायला सांगितले आणि त्याची हत्या केली होती. या हत्येत शहनाजसह सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. शहनाज आता पॅरोलवर आहे.
देवी-देवतांची पूजा, संगमावर स्नान देखील करते
शहनाजला मंदिरात जाऊन पूजा करण्यात काहीही गैर वाटत नाही. ती म्हणते भजन गाऊन माझ्यावर देवी मातेची एवढी कृपा आहे, मला त्यामुळे ओळख मिळाली मग मंदिरात जाऊन पूजा करण्यात काय वाईट आहे. गेल्या वर्षी अलाहाबाद येथील कुंभमेळ्यात तिने संगमावर जाऊन स्नान देखील केले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शहनाज अख्तरचे फोटोज्...