आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात साई मंदिराला टाळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैतूल - मध्य प्रदेशातील बैतूल येथील बालाजीपुरम येथील साई मंदिराला संस्थापकाने टाळे लावले आहे. या मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीचे पूजन तसेच दर्शन ३ सप्टेंबरपासून बंद करण्यात आले आहे. कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मसंसदेत झालेल्या ठरावानंतर हा निर्णय घेतल्याचे संस्थापकांनी म्हटले आहे.
मंदिराचे संस्थापक सेम वर्मा यांनी शुक्रवारी साईबाबांच्या मंदिराला कुलूप लावले. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक बॅनर लावून त्याची सूचना देण्यात आली आहे. वर्मा यांनी सांगितले की, धर्मसंसदेच्या आदेशाचे पालन करत साईबाबांचे पूजन बंद करण्यात आले आहे. मंदिरातील मूर्तीचेही लवकरच विसर्जन करण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने सर्वांना अपील केले आहे की, सोशल मीडिया व पत्राद्वारे या निर्णयावर प्रतिक्रिया कळवाव्यात. यासंदर्भात चर्चेसाठी लवकरच भाविकांची बैठक घेतली जाणार आहे.