आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांना टार्गेट केले जात असल्याचा समता परिषद मेळाव्यात सूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतना (मध्य प्रदेश)- नरेंद्र मोदींच्या रूपाने सध्या एक ओेबीसी व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान असली, तरी असामाजिक तत्त्वांच्या प्रेरणेने घडणाऱ्या घटना- घडामोडी पाहता सामाजिक न्यायाची लढाई अजून पुढे सुरूच ठेवावी लागेल. तसेच अाेबीसी समाजाचा सर्वांगीण िवकास करण्यासाठी या समाजाला राष्ट्रीय स्तरापासून स्थानिक पातळीवरील सत्तेत अाणि न्यायपालिकेतही पुरेसे अारक्षण मिळायला हवे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे मंगळवारी येथे अायाेजित संकल्प महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बाेलत हाेते. दरम्यान, दादरसारख्या घटनांमधून दीनदलितांवर अन्यायच हाेत असल्याचे स्पष्ट हाेते. एवढेच नव्हे तर छगन भुजबळ यांच्यासारख्या लढाऊ अाेबीसी नेत्यांवरही विविध अाराेपांचा भडीमार करुन चाैकशीचा ससेमिरा मागे लावून असाच अन्याय हाेत असल्याचा सूर मेळाव्यात उमटला. त्यामुळे भुजबळांवरील कथित अन्यायाचा मुद्दा देशपातळीवर उपस्थित करण्याचा प्रयत्नच झाल्याचे पाहावयास मिळाले.

संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर हाेणाऱ्या मेळाव्यांची खंडित झालेली परंपरा यानिमित्ताने पुन्हा सुरू झाली. यानिमित्ताने मध्य प्रदेशामध्ये समता परिषदेची मुहूर्तमेढ राेवली गेली. ज्येष्ठ अाेबीसी नेते सुखलाल कुशवाह यांच्या ५२ व्या जयंतीनिमित्त सतना तेथील बीटीअाय मैदानावर दुपारी झालेल्या या महारॅलीस मध्य प्रदेशातून सुमारे लाखभर समर्थक उपस्थित हाेते.

मेळाव्यास संबाेधित करताना समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी अाजही ठिकठिकाणी उच्चवर्णीयांचे प्राबल्य असल्याची बाब िनदर्शनास अाणून िदली. दादरी प्रकरणासारख्या अनेक घटनांचा संदर्भ पाहिला तर देशात गरीब, दलित सुरक्षित नसल्याचे िदसून येते. त्यांच्यावर वारंवार जमीनदार, सरंजामशहा, उच्चवर्णीय राजकीय नेते यांच्याकडून हल्ले हाेत अाहेत. अशारीतीने सामान्य नागरिकांवर हाेणाऱ्या अन्यायाविराेधात सुखलाल कुशवाह यांनी अावाज उठविला हाेता. त्यांचा अादर्श समाेर ठेवत अाता सर्व अाेबीसी समाजबांधवांनी एकत्र राहणे गरजेचे अाहे. इतरांची पालखी वाहण्यापेक्षा स्वत: सत्तेच्या पालखीत बसा. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या िवचारांवर श्रद्धा ठेवून कार्यरत राहा. समाज एकसंध राहिला तरच अन्यायाविराेधात अावाज उठविता येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
मध्य प्रदेशातील सतना येथे अायाेजित समता परिषदेच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, छगन भुजबळ यांचा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भव्य सत्कार केला.

न्याय, हक्कांसाठी साेशल मीडियाचा वापर करा : भुजबळ
फेसबुक,ट्विटर, व्हाॅट‌्सअॅपसारख्या साेशल मीडियाचा वापर फक्त जाेक्स पाठविण्यासाठी करण्यापेक्षा समाजातील तरुणांनी त्याचा वापर न्याय हक्कांसाठी सुरू असलेला संघर्ष पुढे नेण्यासाठी करावा, असे अावाहन माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

इतर मागासवर्ग अायाेगाला घटनात्मक दर्जा द्या :देशात ज्याप्रमाणे अनुसूचित जाती अायाेगाला घटनात्मक दर्जा देण्यात अाला अाहे. त्याच प्रमाणे ताे इतर मागासवर्ग अायाेगालाही देण्यात यावा, त्यातून अाेबीसींवरील अन्याय राेखण्यासाठी अावश्यक ती कायदेशीर पावले उचलली जातील, अशी मागणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने केली.

सिद्धार्थ कुशवाह यांच्याकडे मध्य प्रदेशाचे नेतृत्व :संकल्प महारॅलीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्याचे मध्य प्रदेशातील नेतृत्व सिद्धार्थ कुशवाह यांच्याकडे साेपविण्यात अाले. एकेकाळी ज्येष्ठ नेते अर्जुनसिंग यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला लाेकसभा िनवडणुकीत पराभूत करणाऱ्या सुखलाल कुशवाह यांचे िसद्धार्थ हे पुत्र अाहेत.