आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanskaar Vidya Niketan School Started By The Sanskaar Valley School

आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींसाठी भास्कर समुहाचे संस्कार विद्या निकेतन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षिकांसमवेत पहिल्‍या बॅचच्‍या विद्यार्थिनी - Divya Marathi
शिक्षिकांसमवेत पहिल्‍या बॅचच्‍या विद्यार्थिनी
भोपाल - दैनिक भास्कर समुहाच्या वतीने चालवल्या जात असलेल्या संस्कार व्हॅली शाळेने सोमवारी संस्कार विद्या निकेतन या नव्या शाळेची सुरुवात केली आहे. येथे आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींना संस्कार व्हॅली शाळेप्रमाणे मोफत शिक्षण आणि तसेच वातावरण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पहिल्या बॅचसाठी 100 मुलींना प्रवेश देण्यात आला आहे. पुढील दोन वर्षांमध्ये 500 विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा उद्देश आहे.

संस्कार विद्या निकेतनमध्ये दररोज दुपारी 1 ते 5 या वेळेत केजी-1 पासून इयत्ता तिसरीपर्यंत नियमीत वर्ग चालणार असून उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाणार आहे. यूनिफॉर्मपासून स्कुल बॅग, वह्या आणि पुस्तके आणि आवश्यक ते सर्व शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करुन दिले जाणार आहे. घरापासून शाळेपर्यंत येण्यासाठी मोफत वाहतूक सेवेचीही व्यवस्था केली गेली आहे.

या विद्यार्थिनींना शाळेच्या परिसरात खेळ, हस्तकला, संगीत, व्यावसायिक कौशल्य यांचे शिक्षण दिले जाणार आहे. संस्कार विद्या निकेतनसाठी उच्चशिक्षित आणि आवश्यक पात्रतेच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे शिक्षक विद्यार्थिनींना योग्य शिक्षणाबरोबरच भविष्यातील आव्हानांचा सामना कसा करायचा याचेही धडे देतील. भास्कर समुहाच्या सामाजिक उत्तरदायित्वाबरोबरच या मुलींना उद्याच्या सक्षम नागरिक बनण्यासाठी मदत केली जाईल. ज्यामुळे त्या त्यांच्या पायावर उभ्या राहून कुटुंबाचा आर्थिक आणि सामाजिक स्तर बदलण्यास साह्यभूत ठरतील.
संस्कार व्हॅली ही देशातील प्रमुख 10 शाळांच्या यादीत आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी कदाचित ही देशातील पहिली आणि एकमेव शाळा आहे.